कर्जत : कर्जत-जामखेड विधानसभेचे लोकप्रतिनिधी आमदार रोहित पवार यांची पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारक समितीमध्ये निवड झाल्याने कर्जत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने अध्यक्ष नितीन धांडे यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार पवार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. आ पवार यांना काठी, घोंगडी, पिवळा फेटा आणि पुण्यश्लोक आहिल्यादेवी यांची प्रतिमा भेट देण्यात आली.
सोलापूर विद्यापीठाच्या परिसरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे भव्य स्मारक उभारले जात आहे. यासाठी महाविकास आघाडी सरकारने १७ सदस्याची समिती स्थापन केली आहे. यामध्ये कर्जत जामखेड विधानसभेचे लोकप्रतिनिधी आमदार रोहित पवार यांचा समावेश करण्यात आला आहे.
आ पवार यांची पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारक समितीमध्ये नियुक्ती करण्यात आली असल्याने कर्जत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने अध्यक्ष नितीन धांडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार (ता. २६)ला सत्कार करण्यात आला. आ पवार यांच्या हाती काठी, खांद्यावर घोंगडी, डोक्याला पिवळा फेटा बांधत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची प्रतिमा भेट देण्यात आली.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य गुलाब तनपुरे, नगरसेविका मनीषा सोनमाळी, दिपाली नेटके, दिलीप जाधव, शहराध्यक्ष सुनील शेलार, दादासाहेब थोरात, माजी उपनगराध्यक्ष बापूसाहेब नेटके, शहर युवकचे प्रा. विशाल मेहेत्रे, आण्णासाहेब महारनवर, रवींद्र पांडुळे, ऋषीकेश धांडे, सागर लोंढे, सचिन मांडगे, सचिन लाळगे, पप्पू गायकवाड, अमोल भोसले, सतिष लाघुडे, संदीप गांगर्डे, मनोज गायकवाड, विलास धांडे, गणेश सुद्रीक, सुधीर जगताप, सोशल मीडियाचे दीपक यादव, काका शेळके, राजेंद्र भांडवलकर, बाबासाहेब कोपनर, सचिन दरेकर, पप्पू बोरुडे आदी उपस्थित होते.

Post a Comment