नगर ः शिक्षक बँकेच्या विद्यमान संचालक मंडळाचा एकूण कारभार हा अत्यंत सभासदांभिमुख व समाजामध्ये शिक्षकांची प्रतिमा बुलंद करणारा आहे . भ्रष्टाचाराचा कोणताही मुद्दा या संचालक मंडळाने हाताळलेला नाही. कारभारावर नावे ठेवण्यासाठी मुद्देच नसल्याने अहवालातील फोटोना अल्बमची उपमा देण्याचा केविलवाणा प्रयत्न गुरुकुल मंडळाच्या नेतेमंडळींनी केला आहे. मात्र एकदा त्यांनी इतिहासामध्ये जाऊन आपल्या काळातील अहवाल तपासून पहावे असा सल्ला गुरुमाऊली मंडळाचे जिल्हाध्यक्ष राजकुमार साळवे यांनी दिला.
रविवारी
होणाऱ्या शिक्षक बँकेच्या वार्षिक सभेच्या निमित्ताने सध्या जिल्ह्यात
पत्रकबाजीला उधाण आले आहे. सत्ताधारी व विरोधी गटाकडून वेगवेगळे आरोप
एकमेकावर केले जात आहेत. काल गुरुकुल मंडळाने गुरुमाऊली मंडळाबद्दल अनेक आक्षेप घेतले होते. त्याला उत्तर साळवे यांनी दिले आहे. फोटो नियमानुसार घेतलेले आहे. अनावश्यक फोटोंना
कट लावण्यात आला आहे.
बँकेकडून परागंदा शिक्षकांचे
हफ्ते सभासद मयत कर्ज निवारण निधीमधून तात्पुरते भरण्यात येतात तसेच जे
सभासद नोकरीवर हजर झाले आहेत त्यांच्याकडून पैसे वसूलही करण्यात आले आहेत.
ही प्रक्रिया सातत्याने सुरू असते. परागंदा शिक्षकांच्या कर्जाचे हफ्ते
मयत सभासद कर्ज निवारण निधीतून भरण्याच्या प्रक्रियेला आता आरबीआयने आक्षेप
घेतलेला असल्याने ती पद्धत बंद झाली आहे.
मात्र सरसकट हप्ते भरण्यात आलेले
जमीनदारांना त्रास होऊ नये म्हणून तात्पुरती व्यवस्था म्हणून मयत सभासद
निधी मधुन ते भरले जातात . मात्र ते माफ केले जात नाहीत. याची शहानिशा
विरोधकांनी केली .आमच्या संचालक मंडळाच्या कारभाराला नाव ठेवणा-यांनी
आपल्या काळातील पाच वर्षाचा काळाकुट्ट कारभार आठवावा, बजाज अलायंझ,
कर्मचार्यांच्या बदल्या, बोनस, रजा पगार, मेहेनताना व अशा अनेक गोष्टी
आठवाव्यात असे ही ते म्हणाले.
या पाच वर्षाच्या काळात
बोनस मेहनताना रजेचा पगार या सर्व गोष्टींना फाटा देऊन सभासदाभिमुख कारभार
केल्याचे उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष विठ्ठल फुंदे यांनी यावेळी सांगितले. आपल्या
काळातील कारभाराचे मार्जिन किती टक्के होते हेही आपण तपासून पहावे असा
खोचक सल्ला गुरुमाऊली मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष बाळासाहेब सरोदे यांनी
दिला आहे
विद्यमान
संचालक मंडळाने पहिल्या वर्षी विकास मंडळ उभारणीसाठी निधी देण्याबाबत ठराव
केला असता गुरुकुलचे नेते संजय कळमकर यांनी त्याला कडाडून विरोध केला होता. त्यासाठी आंदोलन देखील करण्यात आले होते . आता मात्र इमारतीसाठी विकास
मंडळाला बँकेने मदत करावी असे कळमकर म्हणत आहेत . त्यांच्यामध्ये असे अचानक
परिवर्तन का झाले ? प्रश्न देखील साळवे यांनी
विचारला आहे .

Post a Comment