नेवासा ः समर्पण फाउंडेशनने गेल्या महिन्यात जायकवाडी उपसा जलसिंचन विभाग यांच्या अंतर्गत असलेल्या नेवासा शाखा क्रमांक एक व शाखा क्रमांक दोन या कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा गैरप्रकार वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर उघडकीस आणला होता.
शाखेतील
कर्मचारी हे पैशाचा अपहार करून शेतकऱ्यांना पद्धतशीरपणे अनेक वर्षांपासून
लुटत असल्याचे समर्पण फाउंडेशनने पुराव्यानिशी सिद्ध केले. या एक सदस्यीय
उच्चस्तरीय समितीची चौकशी अहवाल जायकवाडी जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ शाखेस सहा ऑगस्ट २०२१ रोजी पाठवण्यात आला.
सर्व
बाबींचा शहानिशा करून एक महिन्याच्या आत दोषी कर्मचाऱ्यांचे निलंबन होणे
तसेच त्रयस्थ संस्थेद्वारे सदर शाखेचा दप्तर तपासणी व लेखापरीक्षण अहवाल
होणे अपेक्षित होते. परंतु वरिष्ठ कार्यालयाकडून २४ ऑगस्ट व २५
ऑगस्टला खात्यांतर्गत तपासणीचे आदेश दिले गेले. दोषी कर्मचाऱ्यांवर
अनियमितता सिद्ध झाल्यावर कारवाई करण्याचे त्यात म्हटले गेले.
समर्पण
फाउंडेशन या कारवाईच्या पत्रावर व चाललेल्या तपासणीच्या देखाव्यावर
तीव्र आक्षेप नोंदवला आहे. खात्यांतर्गत तपासणी व कारवाईने शेतकरी हिताचा
कोणताही निर्णय होणार नसल्याचा व दोषी कर्मचाऱ्यांना क्लीनचिट देण्यासाठी
हे तपासणीचे नाटक सुरू असल्याचा फाऊंडेशनच्या वतीने म्हटले आहे.
वरिष्ठ
कार्यालयाकडून दोषी कर्मचाऱ्यांना सौम्य कारवाई करून व सोयीस्कर संज्ञेचा
वापर करून वाचवण्याचा प्रयत्न चालू असल्याचा व शेतकऱ्यांचे पैसे लुटून ते
वर्षानुवर्षे आपल्या जवळ बाळगून शेतकऱ्याला कोणत्याही प्रकारची पावती न
देणे याला अपहार करणे आणि दोषी कर्मचाऱ्यांनी दप्तर वेळेवर न भरणे,
दप्तरात नोंदी न करणे भरलेली नसणे, भरणा केलेल्या पैशाच्या पावत्या
शेतकऱ्यास वेळेवर न देणे, तसेच एका गोष्टीसाठी वसूल केलेले पैसे दुसऱ्याच
सदराखाली शासनाकडे जमा करणे या सर्व बाबी अनियमित येतात. त्यामुळे खालील
मागण्या फाउंडेशनच्यावतीने करण्यात आल्या आहेत.
कुठल्याही
कर्मचार्याला पाठिशी न घालता पैशाचा अपहार केल्याप्रकरणी त्या
कर्मचाऱ्यांवर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना निलंबित करण्यात
यावे. शेतकर्यांकडून घेतलेले पैसे हे शेतकऱ्यांच्या
थकबाकीत भरण्यात यावेत. दप्तर तपासणी व लेखापरीक्षण जायकवाडी जलसंपदा
व्यतिरिक्त दुसऱ्या संस्थेकडून करण्यात यावे.
दोषी कर्मचाऱ्यांना दप्तर हाताळणी करू देऊ नये तसेच दप्तरात नोंदी करण्यास मज्जाव करण्यात यावा. दोषी कर्मचार्यांकडे असलेली पावती पुस्तके तातडीने जमा करून घेण्यात यावीत. वरील
सर्व मागण्या विनाविलंब कार्यान्वित झाल्या नाहीत तर जायकवाडी उपसा
जलसिंचन योजनेची नेवाश्यात असलेल्या सर्व कार्यालयाला समर्पण फाऊंडेशन व
शेतकरी कुलूप लावून येथील काम बंद करण्याचा इशारा प्रसिद्धी पत्रकात
देण्यात आला आहे.
"सदर बाबतीमध्ये सर्व बाबी लक्षात येऊन सुद्धा वरिष्ठ कार्यालयाकडून वेळकाढूपणा करण्यात येत आहे दोषी कर्मचाऱ्यांना दप्तर हाताने करू देऊन व पावती पुस्तके ताब्यात घेऊन त्यांना अनियमितता व आर्थिक अपहार झाकण्याच्या हिशोबाने संधी देण्यात येत आहे ही धरणग्रस्त व लाभधारक शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक आहे आम्ही याचा निषेध करत आहोत आणि त्वरित कारवाईची मागणी करत आहोत." -जगन्नाथ पाटील कोरडे सचिव जायकवाडी धरणग्रस्त शेतकरी कृती समिती नेवासा तालुका

Post a Comment