नगर : जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या संचालक मंडळाने अनागोंदी कारभार करत लाखो रुपयांची अनावश्यक उधळपट्टी केल्यामुळे शिक्षक सभासदांची आर्थिक पिळवणूक झाल्याचा आरोप अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य संघटक राजेंद्र निमसे व ऐक्य मंडळाचे जिल्हा सरचिटणीस सुरेश नवले यांनी केला आहे .
याबाबत पत्रकात
म्हटले आहे की वार्षिक ऑनलाइन सभा व संचालक मंडळाच्या प्रवासभत्त्यापोटी या
संचालकांनी लाखो रुपयांची उधळण केली आहे . या संचालक मंडळाच्या
कार्यकाळाची मुदत संपलेली असून या संचालक मंडळाने राजीनामा देऊन या बँकेवर
प्रशासकाची नियुक्ती होणे अपेक्षित होते.
मात्र या सर्व संचालक मंडळाने
याचा विचार न करता फक्त स्वतःचे खिसे भरण्याचे काम केले आहे .वास्तविक
पाहता शिक्षक बँकेची सभा ऑनलाईन असताना १२ हजार बँकेचे अहवाल छापण्याची
आवश्यकताच नव्हती . मात्र फक्त बँकेच्या अहवाल छपाईतून मिळणारा मलिदा व
स्वतः च्या संघटनेच्या नेत्यांचे फोटोसेशन डोळ्यासमोर ठेवूनच या
संचालकांनी अनावश्यक असे लाखो रुपये उधळले आहेत
येत्या
रविवारी होणाऱ्या शिक्षक बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सत्ताधारी
संचालक मंडळाच्या गैरकारभाराचा पर्दापाश करणार असल्याचे अखिल महाराष्ट्र
प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हा सरचिटणीस सुनील शिंदे व जिल्हा कार्याध्यक्ष
शरद वांढेकर यांनी म्हटले आहे .
या
ऑनलाईन वार्षिक सर्वसाधारण सभेत सत्ताधारी संचालकांना ऐक्य मंडळ जाब
विचारणार असून योग्य पद्धतीने वार्षिक सर्वसाधारण सभेत समाधान कारक उत्तरे न
मिळाल्यास ऐक्य मंडळातर्फे जिल्हाभर आंदोलन छेडण्याचा इशारा अखिल
महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य सरचिटणीस कल्याण लवांडे, राज्य
उपाध्यक्ष सुनील जाधव, राज्य संघटक राजेंद्र निमसे, जिल्हा नेते सर्जेराव
राऊत, संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कदम, जिल्हा सरचिटणीस सुनील शिंदे,
जिल्हा कार्याध्यक्ष शरद वांढेकर, जिल्हा कोषाध्यक्ष संजय शेळके, ऐक्य
मंडळाचे जिल्हाध्यक्ष रामप्रसाद आव्हाड जिल्हा सरचिटणीस सुरेश नवले, जिल्हा
कार्याध्यक्ष विष्णू चौधरी, जिल्हा कोषाध्यक्ष दत्तात्रय परहर, महिला
आघाडी जिल्हाध्यक्ष दिपाली पुराणिक, जिल्हा सरचिटणीस संगीता घोडके, प्रदीप
चक्रनारायण शिवाजी ढाकणे, सुधीर रणदिवे, रज्जाक सय्यद, विलास लवांडे, प्रकाश
पटेकर, ज्ञानदेव कराड, संदीप भालेराव, नंदू गायकवाड, ज्ञानदेव उगले, मधुकर
टकले, पांडुरंग देवकर ,प्रवीण शेळके , अशोक दहिफळे, राहुल व्यवहारे,
बथुवेल हिवाळे ,सुखदेव डेंगळे, भारत शिरसाट , जनार्दन काळे,संभाजी तुपेरे
,शिवाजी माने, राजेंद्र सुतार, लक्ष्मण चेमटे, रवींद्र अनाप, सुधीर
बोर्हाडे, संजय सोनवणे, शहाजी जरे, प्रकाश कदम आदींनी दिला आहे.

Post a Comment