नेवासा ः पर्यावरण संवर्धन कार्य हीच ओळख हा मंत्र घेऊन केवळ शेतीचा बांध व अंगणात वृक्ष लागवड, साफसफाई न करता स्वखर्चाने महादेव मंदिर, गाव परिसर व गावातील स्मशानभूमित वृक्षरोपण केले. असे एकूण शंभरहून अधिक वृक्षांची लागवड केले. तर स्मशानभूमित वृक्षारोपन करून त्याचे संवर्धनही करणे व तेथील स्वच्छता करणे हे त्याचे नित्याचे काम ठरले आणि परिणामी स्मशानभूमीचे नंदनवन झाले.
तरवडी (ता. नेवासा) येथील समाजसेवक व वृक्षमित्र शंकर
रामभाऊ कन्हेरकर हा युवक गत वर्षापासून आपल्या कार्यातून ओळख हा मानस
करून कोणाचा वाढदिवस असेल किंवा वास्तुशांतीचे निमत्रंण असेल वा कोणाचा
सत्कार समारंभ असेल त्याठिकाणी हा युवक वृक्षरोप देऊन त्यांचा सत्कार करणे
हे समाजकार्य गेल्या वर्षा पासून सुरु करत असतो. आपण दिलेले वृक्ष लावले की
नाही व त्या वृक्षाची वाढ झाली की नाही याची संबधिताकडे चौकशीही करतो.
महादेव
मंदिर परिसर, उपआरोग्य केंद्र, कुकाणा पोलिस दूरक्षेत्र येथे स्वखर्चाने
वृक्ष भेट दिली. याच बरोबर गावातील स्मशान भूमीत वृक्षारोपण करून त्याचे
संगोपण ही केले आज ती झाडे एक वर्षाची पूर्ण झाली. माजी सरपंच बाबासाहेब
घुले यांच्या प्रेरणेतून हे मी कार्य करत आहे.
त्यांनी गावातील विकास
कामाला महत्व देत स्मशान भूमिचे शुशोभिकरणास प्राधन्य दिले आहे. तर तेथे
लावण्यात आलेल्या वृक्षांना पाण्याची व्यवस्था पोलिस पाटील विकास भागवत,
सरपंच जालिंदर तुपे, उपसरपंच दत्तात्रय भारस्कर यांनी केली.
Post a Comment