मलंग गड थरार... आमची स्वारी सोनमाचीच्या दिशेने पुढे निघाली...


का
ठया खेळून आणि फोटो काढून झाल्यावर आमची स्वारी सोनमाचीच्या दिशेने पुढे निघाली. आमची आयोजक टीम  मागे असल्याने रस्ता विचारत विचारत जावे लागले. सांगायला खूप खंत वाटते. पण रस्ता विचारत असताना आलेला अनुभव काही चांगले नव्हते.  पण असो आम्हाला त्याच्याशी काही देणे घेणे नसल्याने आम्ही आमचे मार्गक्रमण करत करत पीर दर्ग्याला नमन करून सोनमाची कडे निघालो. 
 
जसा आम्ही दर्गा सोडला तसा रस्ता दिसायचाच बंद झाला. पण तिथून आम्हाला सोनमाचीकडे कड़े जाणाऱ्या पायऱ्या पुसटशा दिसत होत्या त्या दिशेने आम्ही एका झऱ्याच्या मार्गे पुढे सरकत होतो. तीव्र चढण, खडकाळ रस्ता, पाणी सारखे वाहत असल्याने दगड निसरडे झालेले त्यामुळे एक एक पाऊल काळजीपूर्वक टाकत आम्ही पुढे सरकत होतो. 
 
आता आम्ही सोनमाचीच्या पायथ्याला येऊन धडकलो. आमच्या समोर उभ्या होत्या सरळ उभ्या कातळात  कोरलेल्या धोकादायक पायऱ्या. आम्ही जरा संभ्रमात पडलो होतो की पायऱ्या चढून वर जायचे की मागच्या टीमची वाट पाहायची कारण त्या टीम बरोबर एक्सपर्ट पण होते.त्यांचा फायदा आम्हाला होणार होता पण तेव्हड्यात आमच्यातला अशोक ने सूत्र हातात घेतली आणि तो पुढे झाला. 
 
मग आम्ही सगळे एकापाठोपाठ एक असे त्या खड़कात कोरलेल्या पायऱ्या ज्या काही ठिकाणी तुटलेल्या होत्या त्या पायऱ्यांवर जणू काही स्वार झालो. आणि एक एक पायरी सयंमाने चढत चढत सुरक्षित सोनमाचीवर पोहोचलो. वर पोहोचल्या पोहोचल्या आमच्या समोर होता गडाच्या बालेकिल्ल्याचा प्रचंड आकारचा आवाढव्य असा डोंगरकड़ा. सोनमाचीचे प्रवेशद्वार दगडी शिळा वापरून  बांधलेले आहे. 
 
त्या बांधलेल्या माचीवर उभे राहिले की खालचा सगळा परिसर व्यवस्थित नजरेच्या टप्प्यात येतो. त्यामुळे मागून येणारी आमची टीम येताना स्पष्ट दिसत होती. आयोजक ट्रेकर्स टीम मधील काही सदस्य दोरखंड घेऊन पुढे आले होते. आणि पुढे जाऊन ते पाईप क्रॉशिंग आणि तिथुन पुढे सेफ्टी दोर बांधण्याच्या कामाला लागले होते. त्यांना अजून वेळ लागणार होता त्यामुळे आम्ही सोनमाचीवर फोटो काढण्यात मग्न झालो. (क्रमशः)
-शब्दांकन : विजय रोहोकले, शिरूर
- संकलन  : कारभारी बाबर सर

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post