कर्जत पोलीस ठाण्यात रक्षाबंधन...


कर्जत ः कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्था व जन शिक्षण संस्थान, अहमदनगर अंतर्गत सुरू असलेल्या ब्युटीपार्लर व फँशन डिझायनिंग प्रशिक्षण मधील सर्व विद्यार्थीनी मैत्रिणींना सोबत घेऊन कर्जत पोलीस ठाण्यात रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

एरव्ही चुकूनही पोलीस स्टेशनची कधीच पायरीही चढण्याचं धाडस नसणाऱ्या सर्व मैत्रिणी या उपक्रमात अतिशय उस्फुर्तपणे सहभागी झाल्या होत्या.कोरोनाच्या काळात पोलीस बांधवांनी आपल्या कुटुंबाप्रमाणे सर्वांची काळजी घेऊन स्वतः अहोरात्र रस्त्यावर उभा राहून आपले कर्तव्य राखून कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवली.अशा आपल्या या बांधवाप्रति आदर सन्मान राखण्यासाठी पोलीस ठाण्यात रक्षाबंधन आयोजित करण्यात आले होते.
 

तसेच कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी कर्जत पोलीस ठाण्यात हजर झाल्यापासून तालुक्यातील महिलांमुलींना समाजात होणाऱ्या त्रासापासून नेहमीच संरक्षण दिले आहे.या भूमिकेमुळे ते आणि सर्व पोलीस बांधव समाजातील तमाम महिलावर्गाचे भाऊ आहेत.अशी भावना यावेळी स्वाती पाटील यांनी व्यक्त केली. 
 
रक्षाबंधन कार्यक्रमास पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्यासह पोलीस अधिकारी,कर्मचारी ,महिला कर्मचारी हे उपस्थित होते. या कार्यक्रमाने पोलीस भारावले. यावेळी स्वाती पाटील, शबनम मुंढे, अश्विनी घेरडे, सुनीता घालमे, सुरेखा माने, रजनी बरबडे, शिल्पा माळवे, वैष्णवी पठाडे, वनिता जगताप,शिल्पा राठोड आदी महिलांसह विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post