​कांद्याला अवघा इतकाच भाव


पारनेर ः
येथील बाजार समितीत कांद्याचे आज (बुधवारी) लिलाव झाले. कांद्याची साडे आठ हजार  कांदा गोण्यांची आवक झाली. यामध्ये कांद्याला अवघा 1900 रुपयांचा भाव मिळाला.
 
सध्या कांद्याला मागणी कमी झालेली आहे. त्याचा परिणाम थेट भावावर झालेला आहे. कांद्याला सध्या सर्वाधिक भाव 1900 रुपयांचा मिळत आहे. येथील बाजार समितीत कांद्याची एकूण आठ हजार 464 कांदा गोण्यांची आवक झाली.
 
कांद्याचे प्रतवारीनुसार भाव ः एक नंबर कांदा ः 1800 ते 1900, दोन नंबर कांदा ः 1500 ते 1700, तीन नंबर कांदा ः एक हजार ते 1400, चार नंबर कांदा ः 200 ते 900
 
कांद्याची प्रतवारी करून तो बाजार समितीत विक्रीस आणावा,असे आवाहन बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांनी केलेे आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post