श्रीगोंदा ः ओबीसी
बांधवांना त्यांच्या हक्काचे राजकीय आरक्षण मिळून देण्यात न्यायालयात
अपयशी ठरलेल्या निष्क्रिय आघाडी सरकारच्या विरोधात आज भाजपातर्फे श्रीगोंद्यात निदर्शने करण्यात आली.
आमदार बबनराव पाचपुते यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा
तहसील कार्यालयासमोर निदर्शने व निवेदन देण्यात आले.
यावेळी जिल्हा
सरचिटणीस बाळासाहेब महाडिक, भाजपा तालुका अध्यक्ष संदीप नागवडे, बाप्पू तात्या गोरे, अशोकराव खेंडके, महेश लांडे,
शहराध्यक्ष उकांडे, युवामोर्चा अध्यक्ष नितीन आण्णा नलगे, महिला तालुका
अध्यक्षा सुहासिनी गांधी, भाजपा तालुका सरचिटणीस दीपक शिंदे, तालुका
उपाध्यक्ष अशोक इश्वरे, नगरसेवक शहाजीराजे खेतमाळीस, संतोष
क्षीरसागर, महावीर पटवा, महिला जिल्हा चिटणीस अनुजा गायकवाड, जिल्हा
युवती मोर्चा संध्या रसाळ, महेश क्षीरसागर, ऋषिकेश गोरे, सतीष काळे, संतोष
मेहेत्रे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
सरकारला न्यायालयात बाजू मांडता न आल्यामुळे ओबीसींचे आरक्षण गेलेले आहे. हे सरकार अपयशी सरकार असल्याच्या भावना या वेळी मान्यवरांनी व्यक्त केल्या.
Post a Comment