नगर : अँट्रॉसिटीच्या गुन्ह्यामध्ये पसार असलेले भाजपाचे माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याच्यासह त्याचा भाऊ श्रीकांत यांना तोफखाना पोलिसांनी आज अटक केली आहे.
दिल्ली गेट परिसरामध्ये मागील महिन्यामध्ये एका गाळेधारकांना दमदाटी करून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून धमकावण्याचा प्रकार छिंद्दम व त्याच्या साथीदाराने केला होता. या प्रकरणासंदर्भात संबंधित व्यक्तीने त्याच्या साथीदारांना विरोधात येथील तोफखाना पोलिस ठाण्यांमध्ये अँट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला होता.
या प्रकरणानंतर हे दोघेही पसार झाले होते. त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु होता. या छिंदम बंधू नगरला आले असल्याची माहिती मिळाल्यानंतर तोफखाना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन अटक केली आहे .
या दोघांनाही तोफखाना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणातील उर्वरित साथीदारांचा शोध घेत आहे.

Post a Comment