नगर : राज्य शासनाने महसूल विभागातील विविध संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून नगर जिल्ह्यातील काही अधिकाऱ्यांचाही यामध्ये समावेश आहे. नगरच्या रिक्त असलेल्या अप्परजिल्हाधिकारीपदी गडचिरोली येथून बदलून आलेले सोनाप्पा यमगर यांची नियुक्ती झाली आहे.
नगरचे अप्पर जिल्हाधिकारी पी. एल. चोरमारे हे 31 मार्च रोजी सेवानिवृत्त झाल्यापासून हे पद रिक्त होते. केव्हापासून हे पद रिक्त होते.
या पदावर गडचिरोली येथून सोनाप्पा यमगर हे बदलून आले आहेत. नगरचे विशेष भूसंपादन अधिकारी क्रमांक तीन अजित थोरबोले यांची कर्जतच्या प्रांताधिकारीपदी बदली झाली आहे.
भूसंपादन विभागात उपजिल्हाधिकारी पदावर नंदुरबार येथून बालाजी क्षीरसागर तसेच नाशिकच्या आदिवासी विकास विभागातील सहाय्यक आयुक्त कार्यालयातील संदीप चव्हाण हे बदलून आले आहेत . याशिवाय जिल्ह्यातील तहसीलदार संवर्गातील सहा अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत.
यामध्ये शेवगावच्या तहसीलदार अर्चना पागिरे भाकड यांची नगरला अन्नधान्य वितरण अधिकारीपदी बदली झाली आहे. नगरचे अन्नधान्य वितरण अधिकारी छगन वाघ यांची शेवगाव तहसीलदारपदी बदली झाली आहे.
श्रीगोंदा येथील रिक्त असलेल्या तहसीलदारपदी मिलिंद कुलथे हे धुळे जिल्ह्यातून बदलून आले आहेत.
कोपरगावचे तहसीलदार योगेंद्र चंद्रे यांची जामखेड तहसीलदारपदी बदली झाली आहे . कोपरगावला भामरागड, गडचिरोली येथून विजय बोरुडे हे बदलून आले आहेत .
अकोले रिक्त असलेल्या तहसीलदारपदी वर्धा येथून आलेले सतीश थेटे यांची नियुक्ती झाली आहे.

Post a Comment