प्रकाश वाईन्समधीस चोरीचा पडदाफाश...


नगर : प्रकाश वाईन्स, झोपडी कॅन्टीन या दुकानाचे व्यवस्थापक यांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून रोख रक्कम लुटणारे आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केला आहे.

आरोपी लखन नामदेव वैरागर (वय वर्ष 29) याने गुन्ह्याची कबुली दिली. या गुन्ह्यातील इतर आरोपींसंदर्भात दिलेल्या माहितीवरून, प्रमोद बाळू वाघमार (वय 23, राहणार नागापूर), विशाल भाऊसाहेब वैरागर (वय वर्ष 25 राहणार रस्तापूर नेवासा), दिपक राजू वाघमारे (वय 20 राहणार, नागपूर) यांना विविध ठिकाणाहून ताब्यात घेतले आले.

याबाबत माहिती अशी की, शहरातील झोपडी कॅन्टीन परिसरात असलेल्या, प्रकाश वाईन्स या देशी विदेशी दारू विक्रीच्या दुकानात, 12 सप्टेंबर च्या रात्री दहा वाजेच्या सुमारास, आशिर शेख नावाच्या वाईन्स  येथील मॅनेजर घरी जाण्यास निघाला असता, विनानंबर असलेल्या पल्सर गाडीवरून आलेल्या दोन अज्ञातांनी शेख यांच्या डोळ्यात, मिरची पूड टाकून, त्यांच्या जवळील 10 लाख 70 हजारांची रोख रक्कम पळून नेल्याचा घटना घडली होती. 

या संदर्भात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ढुमे यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके हे देखील समांतर तपास करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकारी व अंमलदारांची वेगवेगळी पथके तयार करुन, आरोपींचा शोधार्थ रवाना करण्यात आली होती. 

या तपासा दरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ दिवटे, पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप घोडके, संदीप पवार, दत्तात्रय गव्हाणे, मनोहर गोसावी, पोलीस नाईक रवि सोनटक्के, शंकर चौधरी, ज्ञानेश्वर शिंदे, लक्ष्मण खोकले, संदीप चव्हाण, भरत बुधवंत, योगेश सातपूते, सागर ससाणे, कमलेश पाथरुट आदींच्या पथकाने नागापूर येथून आरोपी लखन नामदेव वैरागर, वय वर्ष 29 ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखविताच, आरोपी वैरागर याने गुन्ह्याची कबुली दिली. 

या गुन्ह्यातील इतर आरोपीसंदर्भात दिलेल्या माहितीवरून, प्रमोद बाळू वाघमार(वय वर्ष 23, राहणार नागापूर), विशाल भाऊसाहेब वैरागर (वय वर्ष 25 राहणार रस्तापूर नेवासा) दिपक राजू वाघमारे (वय वर्ष 20 राहणार, नागपूर) यांना विविध ठिकाणाहून ताब्यात घेतले आले.

यावेळी त्यांच्या वाटेला आलेले, 5 लाख 20 हजार रोख रक्कम, गुन्ह्याचे वेळी वापरलेल्या 3 लाख 40 रुपये किंमतीच्या तीन दुचाकी, व 42 हजार 500 रुपये किंमतीचे 5 चार मोबाईल असा एकूण, 9 लाख 2 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

आरोपींना मुद्देमालासह तोफखाना पोलीस ठाण्यात हजार केले आहे. यापुढील तपास तोफखाना पोलीस करीत आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post