महिला पदाधिकार्याच्याय मद्यपी पतीचा धुडगूस... माफीनामा टाकून प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न...


अमर छत्तीसे

श्रीगोंदा : तालुक्यातील एका महिला पदाधिकार्यांच्या पतीने मद्यपिवून एका दुकानात धुडगूस घातला. हे प्रकरण अंगलट येण्याची शक्यता दिसताच महिला पदाधिकार्याने माफीमागून पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र या प्रकरणाची सध्या तालुक्यात जोरदार चर्चा सुरु आहे.

तालुक्यातील एका महिला पदाधिकार्याचा मद्यपिवून धुडगूस घालण्याच्या घटना गावात या अगोदरही पडलेल्या आहेत. त्यावर अनेकांनी त्यावर नावाची व्यक्त केलेली आहे. त्या व्यक्तीचा त्रास काही शासकीय कर्मतार्यांनाही या अगोदर झालेला असून तशी चर्चा सध्या तालुक्यात सुरु आहे.

काही दिवसांपूर्वीच संबंधिताने एका दुकानासमोर उभे राहून नको तो उद्योग केला. त्यामुळे संतप्त झालेल्या त्या दुकानदाराने संबंधितला शिव्यांची लाखोली वाहिली. 

त्यानंतर त्या व्यक्तीने तेथून काढता पाय घेतला. संबंधिताला वाटले आता प्रकरण मिटेल. पण या प्रकरणाची तालुक्यात चांगलीच चर्चा सुरु झाली होती. ही चर्चा महिला पदाधिकार्यांच्या कानावर गेल्याने त्यांनी संबंधितांची भेट घेऊन माफी मागितला. अन् प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

या घटनेची मात्र सध्या तालुक्यात चर्चा सुरु आहे. संबंधितांच्या या वागण्याचा अनेकांना मनस्ताप होत आहे. त्या व्यक्तीने आपल्या वागण्यात सुधारणा करण्यासाठी महिला पदाधिकार्यांनी पुढाकार घ्यावा, असे मत ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.

असाच प्रकार याच एक प्रकार ग्रामपंचायतच्या पदाधिकार्याकडून घडला आहे. एका छोट्या गावात गेल्यानंतर त्याने नको तो उद्योग केल्यानंतर त्याला तेथे प्रसाद खाऊन घरी परतावे लागले आहे. याची कुठेच चर्चा व बोभाटा होऊ नये म्हणून खबरदारी घेण्यात आली. मात्र त्याची दबक्या आवाजात चर्चा मात्र सुरु आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post