महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी दीपक देवमाने... सचिवपदी ओंकार दळवी यांची बिनविरोध निवड


जामखेड ः
जामखेड तालुका महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दैनिक पुढारीचे तालुका प्रतिनिधी दीपक देवमाने, उपाध्यक्षपदी  अविनाश ढवळे तर सचिवपदी दैनिक प्रभातचे तालुका प्रतिनिधी ओंकार दळवी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, सरचिटणीस विश्वासराव आरोटे, जिल्हाध्यक्ष दत्तात्रय पाचपुते यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी तालुकाध्यक्ष शिवाजी इकडे यांच्या अध्यक्षतेखाली जामखेड येथे रविवार (ता. 26) ला आयोजित केलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

यावेळी दैनिक सकाळचे तालुका प्रतिनिधी वसंत सानप, दैनिक केसरीचे तालुका प्रतिनिधी प्रकाश खंडागळे, दैनिक पुढारीचे लियाकत शेख, नगर व्हिजनचे संपादक संजय वारभोग, दैनिक सकाळचे खर्डा प्रतिनिधी डाॅ धनंजय जवळेकर, दैनिक एकमतचे विजय राजकर, पत्रकार निलेश वनारसे, एफएम स्टार न्यूजचे संपादक फारूकभाई शेख, दैनिक प्रभातचे रिजवान शेख, दैनिक पुढारीचे सचिन आटकरे, कायदेशीर सल्लागार वकील प्रमोद राऊत,  वकील जद्दी सय्यद आदी उपस्थित होते.

यावेळी अध्यक्षपदासाठी दिपक देवमाने यांच्या नावाची सूचना ओंकार दळवी यांनी मांडली तर लियाकत शेख यांनी अनुमोदन दिले. सचिव पदासाठी ओंकार दळवी यांच्या नावाची सूचना शिवाजी इकडे यांनी मांडली तर अनुमोदन प्रकाश खंडागळे यांनी दिले.
तदनंतर सर्व सदस्य पदाधिकाऱ्यांनी सर्वानुमते  अन्य कार्यकारणी निश्चित करून जाहीर केली. यामध्ये उपाध्यक्षपदी अविनाश ढवळे तालुका संघटकपदी अक्षय ठाकरे, सहसचिव शंकर कुचेकर, खजिनदार मनोज कोळपकर, कार्याध्यक्ष रामहरी रोडे, प्रसिद्धीप्रमुख तानाजी पवार अशी निवड करण्यात आली. 

यावेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. नुतन पदाधिकार्यांच्या निवडीनंतर आमदार रोहित पवार माजी मंत्री राम शिंदे यांनी अभिनंदन केले. 

सर्व पदाधिकारी व सदस्यांच्या कुटुंबियांचा विमा उतरविणार 
पत्रकार संघाच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांच्या कुटुंबियांचा  दोन लाखाचा विमा उतरणविण्याची जबाबदारी तालुकाध्यक्ष दीपक देवमाने यांनी घेतली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post