संगमनेर : सरपंच सेवा संघ,महाराष्ट्र प्रदेश च्या वतीने यंदाचा मान नेतृत्वाचा सन्मान कर्तृत्वाचा राज्यस्तरीय युवाभूषण पुरस्कार 2021 अखिल भारतीय क्रांतिसेनेचे संगमनेर तालुका युवक अध्यक्ष पेमगिरीचे बाळासाहेब भोर यांना नुकताच प्रदान करण्यात आला आहे.
सरपंच सेवा संघाच्या वतीने त्यांना राज्यस्तरीय युवाभूषण पुरस्कार कोल्हापूर येथे सरपंच सेवा संघांचे राज्याध्यक्ष भाऊसाहेब मरगळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
अखिल भारतीय क्रांतीसेनेच्या माध्यमातून भोर यांनी नेहमीच विविध सामाजिक प्रश्न, मागण्या रोखठोक व प्रभावीपणे मांडल्या आहेत.
राज्यशास्त्र विषयातून पदवीधर असलेल्या बाळासाहेबांनी आपल्या धारदार व सर्वसामावेशक लेखणीतून पत्रकारिता, शेती, आरोग्य, पर्यावरण, उद्योग, शिक्षण या क्षेत्रात भरीव लेखन करून नेहमीच समाजात जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.
विशेषकरून त्यांनी कोरोनाच्या काळात आपल्या खास शैलीत अनेक ज्वलंत प्रश्नांवर लेख लिहून निष्क्रिय व्यवस्थेच्या वर्मावरच वेळोवेळी नेमकी बोट ठेवलं आहे.
नागरिकांनी आपल्या मूलभूत हक्क व अधिकारांवर जेथे जेथे गदा येत असेल तर त्याविरुद्व लढण्यासाठी त्यांनी समाजात जनजागृती सुरु केली आहे.
भोर हे सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातील असून त्यांना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसतानाही जिद्द व संघर्षातून त्यांनी सामाजिक कार्यात आपला ठसा उमटवला आहे.
यावेळी राज्यातील शेती, शिक्षण, आरोग्य, पर्यावरण,उद्योग, समाजकारण अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
Post a Comment