शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द करण्यासाठी भारत बंदला शहर जिल्हा काँग्रेसचा पाठिंबा


नगर :  केंद्रातील मोदी सरकारने शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारे तीन काळे कायदे केले आहेत. हे कायदे रद्द व्हावेत, या मागणीसाठी मागील अकरा महिन्यांपासून शेतकरी बांधव दिल्लीच्या सीमेवर तळ ठोकून बसलेले आहेत. असे असताना देखील शेतकर्‍यांच्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करत त्या निकाली काढण्याऐवजी त्यांना चिरडून काढण्याचा प्रकार केंद्र सरकारकडून सुरू आहे. या विरोधात पुकारलेल्या भारत बंदला अहमदनगर शहर जिल्हा कॉंग्रेसचा पाठिंबा असल्याचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी जाहीर केले आहे. 

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने या संदर्भामध्ये राज्यस्तरावर देशातील सर्व शेतकरी संघटना, डाव्या आघाड्या यांच्या वतीने पुकारलेल्या आजच्या भारत बंदला विधिमंडळ पक्षाचे नेते महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली पाठिंबा दिलेला आहे. अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे देखील या बंदला आता पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. 

किरण काळे यांनी म्हटले आहे की, केंद्र सरकारने देशातील सर्व सरकारी यंत्रणा ताब्यात घेत त्यांना बरबाद करण्याचा अजेंडा राबवण्याची पद्धती अवलंबली आहे. देशातील सार्वजनिक उपक्रम असणारे बँक, रेल्वे, विमानसेवा ह्या विकण्याचा सपाटा लावला असून एक प्रकारे देश विकायला काढला आहे. 

काँग्रेसच्या राजवटीमध्ये या सर्व उपक्रमा मुळे देशामध्ये रोजगार निर्मिती करत सरकारला अधिक सक्षम करण्याचे काम काँग्रेस केले होते. मात्र भाजपने स्वतः काही निर्माण तर केले नाहीच परंतु काँग्रेसने निर्माण केलेले व देशाच्या विकासामध्ये उत्तम योगदान दिलेले उपक्रम विक्रीस काढल्यामुळे देशाची आर्थिक स्थिती डबघाईला आल्याचे दुर्दैवाने पहावे लागत आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post