विधान परिषदेची निवडणुकीला अवधी असला तरी सध्या कोण निवडणुकीला उभे राहिल, याची चर्चा सध्या सुरु झालेली आहे. काहींनी तर मताची आकडेवारी जुळवाजुळव सुरु केलेली आहे. त्यासंदर्भात काहींनी जिल्ह्यातीलच नेत्यांबरोबर प्राथमिक चर्चा केलेली असल्याचेही कार्यकर्त्यांमधून बोलले जात आहे.
विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीकडून सध्या विद्यमान आमदार अरुण जगताप, माजी आमदार चंद्रशेखर घुले, ज्येष्ठ नेते घनश्याम शेलार, ज्येष्ठ नेते प्रताप ढाकणे, माजी आमदार राहुल जगताप यांच्या नावाची सध्या चर्चा सुरु झालेली आहे. परंतु या नावांमध्ये सर्वात वरच्यास्थानी दादाभाऊ कळमकर यांचे नाव चर्चेत आहे.
जिल्ह्यातील इतर नेत्यांना पक्षाने वेळोवेळी संधी देऊन त्यांचे पुर्नवसन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. दादाभाऊ कळमकर यांच्याबाबतीतही पक्षाने वेळोवेळी संधी देऊन तसा प्रयत्न केलेला आहे. मात्र त्यांची पक्षाबाबत असलेली एकनिष्ठपणा पाहून पक्षाने त्यांना आता संधी देण्याची गरज आहे.
राष्ट्रवादी पक्षाच्या बांधणीपासूनच ते पक्षात आहेत. त्यांनी पक्षाला अडचणीच्या काळात साथ देऊन संघटनांत्मक बांधणी केलेली आहे. त्याचा फायदा पक्षाला शहरासह जिल्ह्यात होत आहे. आता त्यांना पक्ष निष्ठेचे फळ आता देण्याची गरज आहे. त्यामुळे आगामी विधान परिषद निवडणुकीत दादाभाऊ कळमकर यांना संधी द्यावी, अशी अपेक्षा सर्वसामान्य कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे.
राज्यात सत्ता आल्यानंतर राष्ट्रवादी काॅंग्रेसने उत्तरेत मंत्रीपद दिलेले आहेत. तसेच साईबाबा संस्थानचे अध्यक्षपदही उत्तरेत दिलेले आहे. मात्र दक्षिणेत मंत्री पद मिळालेले नाही. त्यामुळे आता विधान परिषद निवडणुकीत दक्षिण लोकसभा मतदार संघातीलच उमेदवाराला संधी देऊन राष्ट्रवादीने आगामी निवडणुकांसाठी बांधणी करणे गरजेचे आहे.
दादाभाऊ कळमकर यांना संधी दिल्यास त्याचा आगामी लोकसभा निवडणुकीत शहरातील मतांमध्ये मोठी वाढ होण्यास मदत होऊ शकते, अशी चर्चा सध्या राष्ट्रवादीच्या गोटात सुरु आहे. त्यामुळे पक्षाने दादाभाऊ कळमकर यांच्या नावाचा विचार करणे गरजेचे असल्याचे मतही राष्ट्रवादीचे ज्येष्ठ कार्यकर्त्यांमधून व्यक्त केले जात आहे.
Post a Comment