नगर ः एकीचे बळ मिळते, फळ या म्हणीचा प्रत्येकजण वापर करीत असतो. एकीमुळे अशक्य असलेली कामे शक्य होत असतात. तशी एकी नगर तालुक्यातील हिवरेबाजारने दाखवून दिलेली आहे. गावाने एकत्र येत कोरोनावर मात करून 15 जूनपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला. आज 100 दिवस शाळा सुरु होऊन झालेले आहे. त्यानिमित्ताने गावात शतकपूर्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.
हिवरेबाजार प्राथमिक शाळा पहिली ते सातवी व यशवंत माध्यमिक विद्यालय 8 वी ते 10 वी चे 15 जूनला वर्ग सुरु झाल्याचे 100 दिवस पूर्ण झाले. भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि कोरोना नंतर शाळा सुरु होऊन 100 दिवस पूर्ण झाल्याचा आनंदोत्सव साजरा करत आहोत.
अहमदनगरला आदर्शगाव हिवरेबाजार येथे शाळा सुरू होऊन शंभर दिवस पूर्ण झाले आहे. हिवरेबाजारने गाव कोरोनामुक्त करून १५ जूनपासून शाळा नियमित सुरू करण्याचे धाडस केले होते. त्या धाडसाचे सर्वत्र स्वागतही करण्यात आलेले होते. काहींनी काळजीही व्यक्त केली होती. मात्र गावाच्या निर्णयाने व गावाने विशेष खबरदारी घेतल्याने निर्विघ्न शाळा सुरु राहिली.
हिवरेबाजारने गाव कोरोनामुक्त करून १५ जूनपासून शाळा नियमित सुरू करण्याचे धाडस केले होतेय. त्याला यशस्वी शंभर दिवस पूर्ण झाल्याने गावात समाधान व्यक्त केले जाताय. या निमित्ताने 'शंभर दिवस शाळेचे' हा उपक्रम राबविण्यात आला आहे.
शाळा सुरू करण्याबाबतच्या विषयावर निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, वकृतत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे शाळेत नियमित येणारे विद्यार्थी आणि त्यांचे पालक आपले मनोगत व्यक्त केले. विशेष म्हणजे राज्यात सर्वप्रथम आदर्शगाव हिवरेबाजारने गाव कडक नियमावली लागू करून कोरोनामुक्त करण्यात आले आहे.
कोरोनामुक्तीनंतर हिवरेबाजार गावाने १५ जूनपासून शाळा नियमित सुरू केली होती. हिवरेबाजार प्राथमिक शाळा पहिली ते सातवी आणि यशवंत माध्यमिक विद्यालय 8 वी ते 10 वी चे 15 जूनला वर्ग सुरु झाल्याचे 100 दिवस पूर्ण झाले. भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि कोरोना नंतर शाळा सुरु होऊन 100 दिवस पूर्ण झाल्याचा आनंदोत्सव साजरा करत आहोत असल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली.
Post a Comment