गौण खनिज पथकाने पकडलेला ट्रक तस्करांनी पळवला


श्रीगोंदा : तालुक्यातील अजनुज ते देऊळगाव येथील नदीपात्रात मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत असल्याची माहिती गुप्त माहितीदाराकडून जिल्हा गौण खनिज खनिज पथकाने पकडून दिलेला वाळूचा ट्रक स्थानिक तलाठ्याने व होमगार्डला धमकावून वाळू तस्करांना पळवून नेला. 

ही घटना अजनुज येथे घडली याबाबत अजनुजचे तलाठी सचिन बळी यांच्या फिर्यादीवरून दौंड तालुक्यातील वाळू तस्करावर सरकारी कामात अडथळा आणल्याची फिर्याद दाखल झाली आहे. 

याबाबत सविस्तर माहिती अशी नगर येथील जिल्हा गौण खनिज पथक वाळू तस्करीवर कारवाई करण्यासाठी श्रीगोंदा तालुक्यातील अजनुज येथे आले होते. यावेळी पथकाने वाळूने भरलेला ट्रक पकडला. पण नदीपात्रातून वाहन काढताना तो ट्रक चिखलात रुतल्यामुळे पथकाला ट्रक ताब्यात घेण्यास अडचणी येऊ लागल्या. 

त्या वेळी स्थानिक तलाठी सचिन बळी यांना पथकातील नायब तहसीलदार खातले यांनी संपर्क साधून श्रीगोंदा तहसीलदार चारुशीला पवार यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर तहसीलदार पवार यांनी तात्काळ

मंडळ अधिकारी दिगंबर डहाळे, तलाठी सचिन बळी, मनोज मिसाळ व एक पोलिस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पाठवले.

चिखलात फसलेला ट्रक ताब्यात दिला. त्यानंतर तलाठी बळी व होमगार्ड कांबळे यांनी चालकाला ट्रक काढण्यास भाग पाडले. ट्रक तहसील कार्यालयात घेऊन निघाले. त्यावेळी ट्रक श्रीगोंद्याच्या दिशेने न घेता दौंड तालुक्यातील वडगाव दरेकरच्या बाजुला पुलाजवळ नेला. 

त्यावेळी एका चारचाकी व दुचाकी वरील अनोळखी व्यक्तींनी होमगार्डला दमदाटी करुन ट्रक मधून उतरवून घेत ट्रक पळवून नेला. याबाबत तलाठी सचिन बळी यांच्या फिर्यादीवरून शिरापूर तालुका दौंड येथील अक्षय डाळिंबे या ट्रक चालकासह अज्ञात व्यक्तीं विरोधात श्रीगोंदा पोलिस ठाण्यात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहय्यक पोलिस निरीक्षक दिलीप तेजनकर हे करत आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post