नगर : नगर मनमाड रस्त्याने जाणाऱ्या दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकीने रस्त्याच्यामधील असलेल्या दुभाजकाला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वाराच्या डोक्याला दिशादर्शक फलकाचा लोखंडी पोल लागल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला, तर मागे बसलेली वृद्ध महिला गंभीर जखमी झाली. ही घटना नगर मनमाड रस्त्यावरील सावेडी गावाच्या शिवारातील हॉटेल लेमन स्पाइस समोर घडली.
या बाबतची माहिती अशी की कोमल यशोदास पाटोळे (वय 18, नागपूर अहमदनगर) ही तरुणी व रुथाबाई गुलाब पाटोळे ( वय 67 ) यांच्यासह दुचाकीवरुन भरधाव वेगात नागापूरहून नगरकडे येत असताना कोमल हिचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी रस्त्याच्या मधील दुभाजकावर आदळली. त्यामुळे तेथील दिशादर्शक फलकाच्या लोखंडी पोलला धडकली.
लोखंडी पोल डोक्याला लागून कोमल पाटोळे हिचा मृत्यू झाला. तर रुथाबाई पाटोळे या गंभीर जखमी झाल्या. नागरिकांच्या मदतीने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले.
या प्रकरणी तोफखाना पोलिसठाण्यात पोलिस नाईक मोरे यांच्या फिर्यादीवरून अपघाताच्या गुन्ह्याची नोंद केली आहे. अधिक तपास पोलिस हवालदार आंधळे करीत आहे.

Post a Comment