पारनेर : निघोज येथील अल्पसंख्याक समाज व आण्णाभाउ साठे प्रतिष्ठानचे ज्येष्ठ मार्गदर्शक भानुदास सयाजी साळवे यांच्या निधनाने एक मार्गदर्शक हरपला.
सामाजिक व धार्मिक कार्यात त्यांचा नेहमीच सहभाग असे, अल्पसंख्याक समाज व आण्णाभाउ साठे प्रतिष्ठानचे मार्गदर्शक म्हणून ते सातत्याने कार्यरत होते. पारनेर तालुक्यातील वारकरी संप्रदायाची अस्मिता कायम ठेवण्यासाठी भानुदास साळवे यांचे वडील सयाजी महाराज यांनी कायम ठेवली.
पन्नास वर्षांहून अधिक काळ वारकरी संप्रदायात काम करताना समाजात धार्मिक संस्काराचे काम करताना सयाजी महाराज यांनी फार मोठे योगदान दिले.
वडील सयाजी महाराज यांच्या धार्मिक कार्याचे अनुकरण करताना भानुदास साळवे यांनी तेच काम पूर्ण करीत संप्रदायीक काम केले, पारनेर तालुक्यातील पिंपळनेर येथील समाजाची धर्मशाळा सयाजी महाराज साळवे याच नावाने आहे.
धार्मिक कार्यात अग्रेसर असलेल्या सयाजी महाराज यांच्या नावाचा धार्मिक कार्यात दबदबा कायम ठेवण्यासाठी समाजातील लोक संघटित होऊन काम करतात.
अशा वारकरी संप्रदायीक माणसाने त्यांची जिवणयात्रा सुद्धा अनंत चतुर्दशी दिवशी म्हणजे १९ सप्टेंबरला संपवली. हे समाजाच्या दृष्टीने सर्वाधिक महनीय बाब म्हटली पाहिजे. गेली पन्नास वर्षात सामाजिक व धार्मिक कामांच्या
माध्यमातून भानुदास साळवे यांनी वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेऊन समाजात अनुकरणीय काम केले आहे. तसेच त्यांचे चिरंजीव जी एस महानगर बॅंकेचे अधिकारी लक्ष्मणराव साळवे यांनीही उस्तव असो वा सुख दुखाचे कार्यक्रम प्रसंगी गोरगरीब समाजाची जाण ठेवून समाजसेवी संघटनांना भरभरून मदत करीत. वडील भानुदास व आजोबा सयाजी महाराज साळवे यांच्या संस्काराचे अनुकरण करीत धार्मिकता जोपासण्यासाठी काम केले आहे.
साळवे कुटुंबातील सदस्यांनी सुखादुखात सहभागी होत गोरगरीब गरजू घटकांना आधार देण्याचे काम केले आहे. गोसेवा असो वा मानवसेवा असो या माध्यमातून मनुष्यरुपी ईश्वर सेवेचे पुण्य मिळवले आहे.
साळवे कुटुंबातील ही आजपर्यंतच्या सर्व पिढ्यांनी समाजरुपी व धार्मिक काम केल्याने वडील भानुदास व आजोबा सयाजी महाराज साळवे यांचा नावलौकिक वाढवण्याचे काम केले आहे.
बाबाजी साळवे, सुभाष साळवे, रामदास साळवे, जी एस महानगर बॅंकेचे अधिकारी लक्ष्मणराव साळवे, सखुबाई सर्जेराव आल्हाट, शारदा शिवाजी जाधव यांचे ते वडील होत.
भावपूर्ण श्रद्धांजली
ReplyDeleteभावपूर्ण श्रद्धांजली बाबा....
ReplyDeletePost a Comment