कर्जत : भाजपाने आपल्याला विविध पदावर काम करण्याची संधी दिली होती. ती आपण आपल्या योग्य कौशल्याने यशस्वीरित्या पार पाडली. यावेळी काम करताना अनेक पदाधिकारी यांची मोलाची साथ लाभली. मात्र आज आपण आपल्या भाजपाच्या प्राथमिक व सक्रिय सदस्यत्वाचा राजीनामा भाजपाचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांच्याकडे पाठविला असल्याचे उपनगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. आहे.यावेळी त्यांनी माजीमंत्री राम शिंदे यांचे आभार देखील व्यक्त केले.
अनेक दिवसांपासून कर्जतच्या राजकीय क्षेत्रात भाजपाचे उपनगराध्यक्ष नामदेव राऊत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असून ते लवकरच पक्ष प्रवेश करतील अशी राजकीय चर्चा झडत होती. त्यास शनिवार (ता. १८) ला स्वतः नामदेव राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली.
नामदेव राऊत म्हणाले की, भाजपाच्या विचारधारेप्रमाणे अनेक वर्षे आपण विविध पदावर पदाधिकारी आणि सक्रिय कार्यकर्ता म्हणून काम केले आहे. आपल्या कौशल्याने सर्व जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडली. या काळात अनेक राजकीय मित्र मिळाले. त्यांच्यापासून बऱ्याच गोष्टी शिकण्यास मिळाल्या. या सर्व काळात माजीमंत्री राम शिंदे यांच्या विकासकामात आपण त्यांचे सहकारी असल्याचे समाधान मिळाले. यासह खासदार सुजय विखे, माजीमंत्री शिवाजीराव कर्डिले, माजी जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, यासह स्व. माजी केंद्रीयमंत्री खा दिलीप गांधी, अँड. अभय आगरकर यांचे बहुमोल सहकार्य व मार्गदर्शन लाभले.
आपल्या राजकीय काळात सर्वच स्थानिक भाजपाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यानी सहकार्य केले आहे ते न विसरणारे असल्याचे स्पष्ट केले. मात्र आज आपण आपल्या भाजपाच्या प्राथमिक आणि सक्रिय सदस्यांचा राजीनामा देत असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले.
पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना उपनगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी आ रोहित पवार यांच्या विकासकामाने आपण प्रभावित असून आगामी काळात त्यांच्या सोबत काम करण्याची मानसिकता असल्याचे जाहीर केली.
आगामी काळात आ. रोहित पवार यांच्या बरोबर काम करण्याची तयारी दर्शवून स्तुती सुमने उधळली. २००९पूर्वी ही नामदेव राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवेश केला होता.२००९च्या विधानसभा निवडणुकीच्यावेळी त्यांनी भाजपात प्रवेश केला होता.
नामदेव राऊत यांच्या राजीनाम्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती उपलब्ध होत आहे. त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर कर्जतच्या स्थानिक राजकारणात उलथापालथ होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. मात्र त्यांचा राष्ट्रवादी पक्ष प्रवेश विना अट आणि विना शर्त असल्याची माहिती देखील पुढे येत आहे. राऊत यांच्या जाण्याने महाविकास आघाडी भक्कम राहील का ? असा प्रश्न देखील राजकीय क्षेत्रात चर्चिला जात आहे.
नामदेव राऊत हाच पक्ष...!
तुम्ही भाजपामधून दुसऱ्या पक्षात जाणार आहात.हे कितपत लोकांना रुचेल असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता आपण लोकांच्यासाठी खूप काही केलं आहे त्यांच्या अगदी कुटुंबातील असल्याप्रमाणे त्यामुळे काही लोकांना नामदेव राऊत हाच आपला पक्ष अशी परिस्थिती असल्याचे चित्र आहे.असे नामदेव राऊत यांनी आत्मविश्वासाने सांगितले.
भविष्यातील राजकारणाची 'दिशा'ठरविण्यासाठी भाजपाचा राजीनामा...! आपण भाजपा पक्षाचा राजीनामा दिला हे मी कोणावर नाराज आहे.किंवा पक्षात कोणाचा त्रास आहे म्हणुन नाही दिला आहे.भविष्यात मला माझ्या राजकारणाची 'दिशा'ठरविण्यासाठी घेतलेला हा निर्णय आहे.असे नामदेव राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.जिल्ह्यात आणखी उलथापालथ होणार असल्याचे सूचक वक्तव्यही त्यांनी केले.

Post a Comment