नामदेव राऊत लवकर करणार राष्ट्रवादीत प्रवेश... प्रवेश सोहळ्याची तारिख होणार जाहीर


अमर छत्तीसे

कर्जत ः कर्जत नगरपंचायतचे प्रथम नगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेऊन त्यांनी भाजप सोडत असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे ते कोणत्या पक्षात जाणार या विषयी तर्कवितर्क लढविले जात आहेत. पत्रकार परिषदेत त्यांनी या वेळी आमदार रोहित पवार व राष्ट्रवादीचे गोडवे गायल्याने ते राष्ट्रवादीत जाणार असल्याचे स्पष्ट झालेले आहे. ही प्रवेशाची तारिख अद्याप स्पष्ट झालेली नसली तरी येत्या दोन ते तीन दिवसात ती जाहीर होण्याची शक्यता आहे.
भाजापाचे निष्ठावंत असलेले नामदेव राऊत यांची गेल्या काही दिवसांपासून पक्षात घुसमूट सुरु होती. पक्षाचे नेतेच दिलेले शब्द पाळत नसल्याने भाजपाचे अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी पक्षातून बाहेर पडण्याच्या हालचाल करीत आहेत. प्रसाद ढोकरीकर यांनी या अगोदरच राष्ट्रवादीत प्रवेश केलेला आहे. आता नामदेव राऊत दाखल होत आहे. 
माजी मंत्री राम शिंदे यांची कर्जत व जामखेडमधील पकड कमी होत चालली असल्याचे या वरून आता स्पष्ट होत आहे. नामदेव राऊत सारखा नेता तर राष्ट्रवादीत दाखल होत असेल त्याचा भाजपाला मोठा फटका बसल्याशिवाय राहणार नाही, असे मत आता राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे. 

राऊत यांना दिलेले शब्द पक्ष व स्थानिक नेत्यांकडून पूर्ण झालेले नसल्याने त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. तो आज प्रत्यक्ष कृतीतून त्यांनी दाखवून दिलेले आहे. राऊत यांच्या पक्ष प्रवेशाची तारिख अद्याप जाहीर झालेली नसली तरी ती लवकर जाहीर होईल, असे राष्ट्रवादीच्या गोटातून सांगण्यात आले. 

तेजवार्ताच्या बातमी तंतोतंत खरी ठऱली
तेजवार्ताने मागील आठवड्यातच कर्जतमधील एक नेता राष्ट्रवादीत दाखल होणार वृत्त प्रसिध्द केले होते. ते वृत्त आज तंतोतंत खरे ठरलेले आहे. त्यामुळे अनेक वाचकांनी तेज वार्ताला संदेश पाठवून शुभेच्छा दिल्या आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post