पारनेर : पदांच्या माध्यमातून समाजाभिमुख काम जयसिंगराव बढे यांनी केले आहे. आजच्या युवकांनी त्यांच्या सामाजिक कार्याचे अनुकरण करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन शिरुरचे माजी आमदार पोपटराव गावडे यांनी व्यक्त केले आहे.
गुणोरे गावचे माजी सरपंच जयसिंग तात्या बढे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त गुणोरे येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन माजी आमदार पोपटराव गावडे, जिल्हा परिषद सभापती काशिनाथ दाते, सभापती गणेश शेळके, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील, पंचायत समिती सदस्य डॉ. श्रीकांत पठारे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी गावच्या माजी सरपंच चंद्रभागा जयसिंगराव बढे यांच्या वतीने जयसिंग तात्या बढे यांच्या स्मरणार्थ पाच लाख रुपयांचे पेव्हिंग ब्लॉक दशक्रिया विधी घाट परिसरातील खाशाबा मंदिर परिसरात बसवण्यात आले.
यावेळी राहुल पाटील शिंदे, जिल्हा परिषद माजी सदस्य विश्वनाथ कोरडे, माजी सभापती सुदाम पवार, पारनेर तालुका पत्रकार संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक दत्ता उनवणे, संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष ठकाराम लंके, माजी पंचायत समिती सदस्य किसनराव रासकर, राळेगण थेरपाळचे सरपंच पंकज कारखिले, माजी उपसरपंच सोपान भाकरे, गुणोरे गावचे सरपंच बाळासाहेब खोसे, उपसरपंच कचरशेठ कारखिले, जनसमृध्दी पतसंस्थेचे अध्यक्ष मच्छिंद्र मेसे, उपाध्यक्ष भाऊसाहेब बढे व त्यांचे सर्व संचालक मंडळ, मुख्य व्यवस्थापक राजेश गोपाळे, पारनेर परिवर्तन फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन भालेकर, सुहास शेळके, ज्ञानदेव कारखिले, बाजीराव गोपाळे, कारभारी मेसे, सबाजी मेसे, भाऊ किसन गोपाळे, आबा रासकर, महेंद्र बढे, आम्ही गुणोरेकर फाउंडेशनचे अध्यक्ष विकास बढे, मंगेश सालके, किसनराव सुपेकर, दादाभाऊ निमोणकर, माजी सरपंच पोपटराव कारखिले, माजी सरपंच बाळासाहेब दिघे, बाप्पू दिघे, सखाराम आढाव, सुरेश काणे, तंटामुक्ती उपाध्यक्ष भाऊसाहेब बढे, अण्णासाहेब बढे, सुभाष खोसे, संतोष गोपाळे आदी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
महेंद्र बढे यांच्या आठवणीतले तात्या एक हरहुन्नरी व्यक्तीमत्व या भावनीक ऑडिओ क्लीपने उपस्थितांचे मन भारावून गेले.
माजी आमदार गावडे म्हणाले की, गेली पंचवीस वर्षात जयसिंगराव बढे यांनी सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक क्षेत्रात काम करताना गाव विकासासाठी मोठे योगदान दिले आहे. गुणोरे व परिसराच्या विकासासाठी बढे कुटुंबाचे मोठे योगदान आहे. ग्रामपंचायत, सोसायटी या माध्यमातून त्यांनी जनतेला मोठ्या प्रमाणात आधार देण्याचे काम केले आहे.
कोणत्याही प्रकारची विकासकामे असली तरी बढे पाटील हे सर्वांच्याच पुढे अशा प्रकारे त्यांनी काम केले. आजच्या काळात जयसिंगराव बढे यांच्या सारखा कार्यकर्ता मिळणे अवघड आहे. मात्र त्यांच्या सहवासात जे आले त्यांनी अशाप्रकारे काम करण्याची गरज असल्याचे आवाहन माजी आमदार पोपटराव गावडे यांनी केले आहे.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी जयसिंग बढे यांच्या कार्याचे कौतुक करीत बढे तात्या यांच्या सामाजिक कार्याचे अनुकरण आजच्या युवकांनी करण्याची गरज असल्याचे सांगितले.

Post a Comment