अमर छत्तीसे
कर्जत : कर्जत नगर पंचायतीची निवडणूक जाहीर झालेली नसली तरी राजकीय उलथापालथ सुरु झालेली आहे. इतर पक्षांपेक्षा भाजपातून राष्ट्रवादीत दाखल होत आहे. त्यामुळे माजी पालकमंत्री राम शिंदे या फुटीला कसे रोखतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रसाद ढोकरीकर यांच्यासह नगरसेवक काही कार्यकर्ते राष्ट्रवादीत दाखल झालेले आहे. त्या पाठोपाठ आता कर्जत शहरातील भाजपाचा एक नेता राष्ट्रवादीत दाखल होणार आहे. तशा बैठका झालेल्या असून संबंधित नेत्याने काही शब्द दिलेला नाही. परंतु तो नेता राष्ट्रवादीत दाखल होणार असल्याची चर्चा राष्ट्रवादी व भाजपाच्या गोटात सुरु आहे.
भाजपातील नेते राष्ट्रवादीत दाखल होत असल्याने कार्यकर्ते सैरभैर झालेले आहे. या फुटीच्या ग्रहणावर माजी मंत्री राम शिंदे यांनी तोडगा काढावा, अशी चर्चा आता भाजप कार्यकर्त्यांमधून होत आहे.
भाजपातून कार्यकर्ते राष्ट्रवादीत जाणार अशी चर्चा सुरु असली तरी राष्ट्रवादी व भाजपाचे नेते मात्र त्यावर कुठलीही प्रतिक्रिया देत नसल्याने कार्यकर्ते चिंतेत पडलेले आहेत. नेत्यांनी बोलावे व कार्यकर्त्यांना मुक्तपणे काम करण्यास मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
कर्जत मध्ये सुरु असलेल्या राजकीय घडामोडींमुळे माजी मंत्री राम शिंदे यांनी कर्जत मध्ये येऊ कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याची अपेक्षा अनेकजणांमधून व्यक्त केली जात आहे. सध्या पक्षातून जाणार्या मान्यवरांमुळे कार्यकर्त्यांमध्ये मरगळ आल्याची चर्चा आता कार्यकर्त्यांमध्ये सुरु आहे.

Post a Comment