पारनेर ः तहसीलदार ज्योती देवरे यांच्या अँडिओ क्लिपमुळे संपूर्ण जिल्हा ढवळून निघाला होेता. आज अखेर तहसीलदार देवरे यांची बदलीचा आदेश जारी करण्यात आलेला आहे.
तहसीलदार ज्योती देवरे यांनी अँडिओ क्लिप व्हारल केल्यामुळे राज्यात खळबळ उडाली होेती. त्यामुळे या प्रकरणात काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या प्रकरणात देवरे यांच्याविरोधातही काही तक्रारी होत्या. तसेच देवरे यांनीही तक्रार केली होती. या तक्रारींची चौकशी करण्यात आली. त्यात तथ्य दिसून आले नाही.
देवरे यांची आज बदली झाल्याचा आदेश जारी करण्यात आलेला आहे. देवळे यांची जळगाव येथ बदली झालेली आहे. त्यांच्या जागी नामदेव पाटील यांची पारनेर तहसीलदार म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे.

Post a Comment