खासदार व आमदारांना शुभारंभ केलेल्या कामाचा विसर पडला काय? : नितीन भुतारे

नगर : खासदार व आमदार यांची विकासासाठी एकत्र झालेल्या जोडीला शुभारंभ केलेल्या कामाचा विसर पडला की काय असा सवाल मनेसेचे जिल्हा सचिव नितीन भुतारे यांनी केला आहे.


याबाबत प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की, नगर शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग सककर चौक ते नेप्ती नाका पर्यंत रस्त्याच्या कामाचा शुभारंभ खासदार सुजय विखे व आमदार संग्राम जगताप यांनी सात ऑगस्ट  केला होता. त्याला जवळपास दोन महिने होत आहेत, तरी सुध्दा या कामाला सुरूवात झालेली नाही. 

शुभारंभ झाल्यावर एक महिन्यात या रस्त्याचा चेहरा मोहरा बदलणार, असे खासदार आणि आमदार यांनी सांगितले होते. शहराच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलो आहोत,असे खासदार सुजय विखे यांनी त्यावेळी भाष्य केले होते. 

परंतु आज या कामाचा शुभारंभ होऊन दोन महिने होत आले तरी हे दोघेही जण पुन्हा शहरात विकासासाठी दिसले नाही. या आज या रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. या रस्त्यावरून जाणाऱ्या प्रत्येक नागरिकाला जीव मुठीत घेऊन चालावे लागते, इतके खड्डे झालेले आहेत. 

त्यामुळे त्यामुळे या शुभारंभ केलेल्या कामाचा या खासदार आणि आमदार यांच्या विकास जोडीला विसर पडला की काय असा प्रश्न जनतेच्या मनात उपस्थित झाला आहे, असे भुतारे यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे. 

या शुभारंभ झालेल्या रस्त्याचे काम पूर्ण व्हावे या करिता खासदार आणि आमदार यांना या कामाची आठवण व्हावी म्हणुन व लवकरात लवकर या रस्त्याच्या कामाचा व ड्रेनेजलाईनच्या कामाचा प्रश्न मार्गी लावावा या करिता मनसेच्या वतीने स्मरण पत्राद्वारे शुभारंभ केलेल्या कामाची आठवण करून देत आहोत असेही भुतारे यांनी निवेदनात म्हटले आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post