नगर ः जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या अध्यक्षपदी व उपाध्यक्षची निवडणूक आज पार पडली. यामध्ये अध्यक्षपदाच्या निवडणुकीत बापूसाहेब तांबे सत्ताधारी संचालक मंडळाचे सहा संचालक फुटल्यामुळे रोहकले गटाचे अविनाश निंभोरे यांची अध्यक्षपदी 13 मतांनी निवड झाली. उपाध्यक्षपदी गंगाराम गोडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदाची निवडणूक झाली. तर उपाध्यक्षपदाची बिनविरोध निवड झाली.
जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांच्या अध्यक्षतेखाली पार
पडली. यावेळी बँकेच्या संचालक सीमा क्षिरसागर, उषा बनकर, मंजुषा नरवडे,
विद्युल्लता आढाव, संतोष अकोलकर, दिलीप औताडे, राजेंद्र मुंगसे,
नानासाहेब बडाख, संतोष दुसुंगे, शरद सुद्रिक, अर्जुन शिरसाठ, अनिल भवार,
सलीमखान पठाण, सुयोग पवार, किसन खेमकर, बाळासाहेब मुखेकर, बाबा खरात, राजू
रहाणे, साहेबराव अनाप आदी उपस्थित होते.
बापूसाहेब तांबे गटाचे किसन
खेमनर व रावसाहेब रोहकले गटाचे अविनाश निंभोरे यांच्या अध्यक्षपदाची लढत
झाली. यामध्ये अविनाश निंभोरे हे १३ तर किसन खेमनर यांना अवघी आठ मते
मिळाली. त्यात निंभोरे विजयी झाले. उपाध्यक्षपदी गंगाराम गोडे यांची बिनविरोध निवड
झाली.
अविनाश निंभोरे यांची अध्यक्षपदी निवड होण्यासाठी शिक्षक
परिषदेचे नेते रावसाहेब रोहोकले, संजय शेळके, प्रवीण ठुबे, विकास डावखरे,
संजय शिंदे,भाऊसाहेब ढोकरे आदींचे मार्गदर्शन लाभले.
दरम्यान बापूसाहेब तांबे गटाचे फुटलेले ते सहा संचालक कोण अशीच चर्चा सध्या शिक्षक बॅंकेच्या वर्तुळात सुरु झालेली आहे.
Post a Comment