पाढे तोंडपाठ म्हणा स्पर्धेत कौस्तुभ तोेरकड


नगर ः  येथील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक विद्यालयातील चौथीचा विद्यार्थी कौस्तुभ अनिल तोरकड याने पाढे तोंड पाठ स्पर्धेत मेडल मिळविले आहे.

येथील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक विद्यालयात रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त 22 सप्टेंबर 2021 पासून पाढे पाठांतर उपक्रमाची सुरुवात करण्यात आलेली आहे. 

या स्पर्धेत आता विद्यार्थी सहभागी होत आहे. सध्या कोरोनामुळे शाळा सुरु झालेल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थी अभ्यासाकडे आकर्षित रहावा, यासाठी शाळांकडून विविध उपक्रम राबविले जात आहे. त्यातील पाढे तोंडपाठ या स्पर्धेला चांगला प्रतिसाद शाळेत मिळत आहे. 

या पाढे ताेंड पाठ म्हणा व ताबडतोब मेडल मिळवा, या स्पर्धेचे नियम  शाळेने ठरविलेले आहेत.  इयत्ता चौथीसाठी 25 पर्यंत पाढे तोंडपाठ म्हणता व लिहिता येणे, आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी आठ ते दहा या वेळात पालकांसोबत विद्यार्थ्यांनी शाळेत येऊन पाढे लिहून व तोंडपाठ म्हणून दाखविल्यानंतर त्वरीत मेडल दिले जाते.  22 सप्टेंबरपासून सुरु झालेला उपक्रम हा शैक्षणिक वर्षाच्या अखेरपर्यंत सुरू राहणार आहे. 

पाढे पाठांतर न अडखळता व अचूक म्हणता येत असेल तरच पालकांनी विद्यार्थ्यास शाळेत घेऊन यावे,  अन्यथा विद्यार्थी नाराज होतील. त्यामुळे ही स्पर्धा वर्षभरासाठी आहे. याची पालकांनी नोंद घ्यावी. त्यामुळे पालकांनी घाई करू नये तसेच पाढे पाठांतराचा अनावश्यक दबाव विद्यार्थ्यांवर आणू नये, असे आवाहनही शाळेतर्फे करण्यात आले आहे. 

पाढे पाठांतर हे मराठी किंवा इंग्रजी विद्यार्थ्यांना जे योग्य वाटेल त्या भाषेत म्हणावे व लिहावे. या पाढे पाठांतराचे परीक्षण विद्यालयातच परीक्षकांना मार्फत होईल. त्यानंतर मेडल देऊन विद्यार्थ्याचा सन्मान करण्यात येत आहे.

पाढे तोंडपाठ या स्पर्धेत शाळेत विद्यार्थी आता सहभागी होत आहे. यामध्ये इयत्ता चौथीचा विद्यार्ती कौस्तुक अनिल तोरकड याने सहभाग घेतला. त्याने पाढे तोंड पाठ म्हणून दाखविले. त्यानंतर त्याला मुख्याध्यापक शिवाजी लंके यांच्या हस्ते मेडल प्रदान करण्यात आले. 

या वेळी कौस्तुभची आई रेश्मा तोरकड धुमाळ, शिक्षका जयश्री खांदोडे, मीनाक्षी खोडदे, उर्मिला साळुंके, सुजाता डोमल, राहुल शिंदे, शीतल रोहकले, इंदुमती दरेकर यांचे मार्गदर्शन लाभले. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post