एम. व्ही. देशमुख
नगर ः कर्जतचे प्रथम नगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देऊन जिल्ह्यात राजकीय भूकंप घडून आणला होता. त्या पाठोपाठ जिल्ह्यातील भाजपामधील एक मोठा नेता राजकीय भूकंप घडविणार असल्याची चर्चा सध्या जिल्ह्यात सुरु झालेली आहे. या नेत्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांची भेट घेतलेली असून त्यामध्ये चर्चा झालेली असल्याचे कार्यकर्त्यांमधून बोलले जात आहे.
हे माहिती आहे का ः कर्जतमध्ये भाजपा पडला एकाकी..
नामदेव राऊत यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिलेली असून अद्यापही राष्ट्रवादीत प्रवेश केलेला नाही. मात्र भाजपा सोडत असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केलेले असून आपल्या सदस्यत्वाचा त्यांनी राजीनामाही दिलेला आहे. मात्र याच पत्रकार परिषदेत त्यांनी आमदार रोहित पवार यांच्याबद्दल स्तुतीस्तुमने उधळल्याने ते राष्ट्रवादीत जाणार आहेत, हे स्पष्ट झालेले आहे. त्यांचा प्रवेश सोहळा लवकरच होणार असून त्याची तारीख अद्याप बाकी आहे.
हे वाचले का ः नेवाशात राजकीय वातावरण थंडचं..
नामदेव राऊत यांनी भाजपापासून घेतलेल्या सोडचिठ्ठीमुळे जिल्ह्यात राजकीय भूकंप आलेला आहे. या भूकंपाच्या धक्क्यातून भाजप सावरत नाही तेच पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का भाजपाला बसणार असल्याची चर्चा सुरु झालेली आहे. आगामी एका निवडणुकीच्या निमित्ताने आपल्याला संधी मिळेल की नाही, याची चाचपणी संबंधित नेत्याने भाजपात केलेली आहे. मात्र त्यांना उमेदवारी मिळणार नाही, असे लक्षात येत असल्याने त्यांनी राष्ट्रवादीशी मिळते जुळते घेत भाजपाला सोडचिठ्ठी देण्याचा विचार सुरु केलेला आहे.
हे वाचले का ः नेवाशात राजकीय वातावरण थंडचं..
या संदर्भात संबंधित नेत्याची राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर चर्चा झालेली आहे. या चर्चेत ठोस निर्णय अद्याप झालेला नाही. अद्याप ती निवडणूक लांब असल्यामुळे हा निर्णय अद्याप प्रलंबित असला तरी त्या नेत्याला मात्र भाजपामधून उमेदवारी मिळेल की नाही, मिळाली तर भाजपाकडे तेव्हढे मतदान नसल्याने लढूनही उपयोग होणार नसल्यामुळे त्या नेत्याने राष्ट्रवादीत जाण्यासाठी हालचाली सुरु केलेल्या आहेत.
हे वाचले का ः नेवाशात राजकीय वातावरण थंडचं...
भाजपामधून तो नेता आल्यानंतर मात्र राष्ट्रवादीच्या एका नेत्याला काही दिवस पुन्हा आमदारकीपासून वंचित रहावे, लागणार आहे. त्यामुळे त्या नेत्याची आगामी काळात काय भूमिका राहते, हे पाहणे ही मोठे उत्सुकतेचे ठरणार आहे.
राष्ट्रवादीकडून भाजपाला गेल्या काही दिवसांपासून छोटे मोठे भूकंपाचे झटके दिलेले आहेत. मात्र आता आगामी काळातील हा भूकंपाचा धक्का भाजपाला चिंता व्यक्त करायला लावणारा ठरणार आहे. त्यामुळे भाजप त्या नेत्याला आपल्या पक्षात ठेवण्यासाठी कसे प्रयत्न करते, हे पहाणे महत्वाचे ठरणार असल्याची चर्चा आता भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरु आहे.
हे वाचले का ः नेवाशात राजकीय वातावरण थंडचं..
सध्या सुरु असलेली चर्चा खरी आहे की खोटी आहे, याबाबतही अनेक जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. कारण या अगोदर काहींनी स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये अशा चर्चा घडवून आणून स्वतःचा स्वार्थ साधून घेत दुसर्याची बदनामी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे आगामी काळात काय घडते, हे पाहणे गरजेचे आहे. त्यावर ही चर्चा खरी की खोटी हे ठरणार आहे.

Post a Comment