नगर : कांद्याच्या भावात वाढ झाल्यानंतर शेतकर्यांच्या चेहर्यावर आनंद ओसंडून वाहत असतो. मात्र याच कांद्याच्या भावाचा आधार घेऊन शेतकर्यांच्या भावनांशी अनेकदा खेळत खेळला जात आहे. मात्र हे शेतकर्यांच्या लक्षात येत नाही. भाव वाढ झाल्याचे समजताच शेतकरी मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीस आणतात. आवक वाढली की मग भावात घसरण करून कमी दरात चांगल्या प्रतिचा माल खरेदी केला जातो. भाववाढीचे गणित शेतकर्यांनी ओळखल्यास भावाच्या आधारे होणार खेळ थांबला जाईल.
कांद्याच्या गावावरून अनेकदा बाजार समित्यांमधील लिलावात वादंग झालेले आहे. एक आठवडा भाव उचांकी वाढला जातो. मात्र दुसर्या आठवड्यात अचानक भाव कोसळलेला दिसून येताच शेतकरी आक्रमक होऊन आंदोलन हाती घेतात.
त्यात बाजार समितीचे पदाधिकारी हस्तक्षेप करून वादावर तोडगा काढून लिलाव सुरळीत करतात. मात्र या वेळी संतप्त झालेले शेतकरी दोन तीन गोण्या कांद्याच्या रस्त्यावर ओतून मोकळे होतात. ही चूक कांदा खरेदी करणार्यांची नसून शेतकर्यांची आहे.
कांद्याच्या भाव वाढीचा खेळ शेतकर्यांच्या लक्षात येत नसल्यामुळे असा खेळ वर्षानुवर्षं रंगत आहे. अनेक दिवस भावात घसरण झालेला कांदा अचानक पाचशे ते सहाशे रुपयांनी कसा वाढतो, याचा विचार सर्वांनी करायला हवा.
अनेकदा कांद्याला मागणी वाढते व आवक तेव्हढी होत नाही. झाली तरी चांगल्या कांद्याची आवक होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर जादा भावाचा खेळ खेळला जातो. मोजक्या कांद्याच्या वक्कला जादा भाव दिला जातो. त्यानंतर या जादा भावाच्या पावत्या कांदा उत्पाद यांपर्यंत पोहचविण्याचा तजबेज केली जाते.
एकाच्या तोंडून दुसर्या तोंडी भाववाढीचे संदेश व्हायरल केला जातो. भाव मिळेल, या आशेने शेतकरी कांद्याची मोठ्या प्रमाणात विक्रीस आवक घेऊन जातात. अचानक आवक वाढल्यावर भावात परिणामी घसरण होते. त्यावरून आंदोलने सुरु होतात. अशा घटना सगळीकडे होतात, असे नाही परंतु काही ठिकाणी अशा घटना तर कायम होतात.
दसरा, दिवाळी व नवीन वर्षाच्या स्वागताच्या वेळी भाववाढीचे खेळ खेळला जातो. उन्हाळा कांद्याच्या बाबतीतच अशा घटना सदैव घडत आहे. ही बाब आता शेतकर्यांनी ओळखूनच कांद्याची विक्री करणे गरजेचे आहे.
परंतु कांद्याला चांगला भाव मिळू लागला की शेतकरी मोठ्या प्रमाणात जादा पैशाच्या आशेने आहे. तेव्हढा माल विक्री करण्याचा प्रयत्न करतात. ही पध्दत आता कांदा उत्पादकांनी थांबविणे गरजेचे आहे.
सोन्याचे अंडे देणारे कोंबडीचे रोज अंडे गोळा करणे गरजेचे आहे. एकाच वेळी सगळे सोन्याचे अंडे मिळविण्याची विचारसरणी आता कांदा उत्पादकांनी बदलणे गरजेचे आहे. तरच कांद्याला चांगला भाव मिळून शेतकर्यांच्या हाती पैसा खेळू शकतो.
Post a Comment