पाथर्डीतील हे गाव प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषीत


पाथर्डी ः तालुक्यातील आकोला गावात सध्या कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढत असल्याने ग्रामपंचायतीने २५ सप्टेंबरला आकोला गाव पुढील सात दिवसांसाठी प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे.

आकोला गावात बाहेरील व्यक्तींना  प्रवेशबंदी केली आहे. आज दुपारी प्रांताधिकारी देवदत्त केकाण, पोलिस उपाधिक्षक सुदर्शन मुंडे,पोलीस निरिक्षक सुहास चव्हाण यांनी भेट देऊन आढावा घेतला. ग्रामस्थांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये. मास्कचा वापर करावा तसेच बंद पाळून कोरोना विरोधातील लढाईत सहकार्य करावे असे आवाहन सरपंच संभाजी गर्जे यांनी केले आहे.
 
आकोला गावात सध्या कोरोना बाधीत पंधरा रुग्ण असुन दररोज बाधीत रुग्णांची संख्या वाढत असल्याने शनिवार २५ सप्टेंबर २०२१ रोजीच ग्रामपंचायतीने आकोला गाव पुढील सात दिवस प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जाहीर करून हॉटेल, बाजार, आस्थापना, दुकाने सुरू ठेवण्यास व सार्वजनिक ठिकाणी गर्दी करण्यास बंदी केली आहे. 
 
गावामध्ये कोरोना बाधीत रूणांची संख्या वाढल्याने प्रशासनाने गंभीर दखल घेऊन आज दुपारी प्रांताधिकारी देवदत्त केकाण,पोलिस उपाधिक्षक सुर्दशन मुंडे, पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण यांनी अकोला येथे भेट देऊन परिस्थीतीची पाहणी करून आढावा घेऊन सूचना केल्या.
 
सरपंच संभाजी गर्जे, ग्रामपंचायत सदस्य नारायण पालवे, ग्रामसेवक बाळासाहेब तिडके यांनी प्रांताधिकारी देवदत्त केकाण यांची भेट घेऊन गावातील कोरोना बाबत सर्व माहिती घेतली. चर्चा करून गावात गर्दी होऊ नये यासाठी पुढील दहा दिवस किमान दोन पोलिस कर्मचारी, अरोग्य विभागाचे तात्पुरत्या स्वरूपातील निवासी पथक त्याचबरोबर रॅपिड, अॅंटिजन चाचणी केंद्र, औषधे, गोळ्या सॅनिटायझर, मास्क आदी साहित्य देण्यात यावे यासाठी निवेदन दिले आहे. 
 
यावर सबंधित विभागाला आदेश देऊन सर्व प्रकारचे सहकार्य केले जाईल असे आश्वासन प्रांताधिकारी केकाण यांनी यावेळी दिले. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post