नगर ः पारंपारिक बियाणे संवर्धनातून अकोले तालुक्याला देशात अन् विदेशात ओळख निर्माण झालेली आहे. ही ओळख बीजमाता पद्मश्री राहीबाई सोमा पोपेरे यांच्यामुळे झाली आहे. पोपेरे यांनी जीवापाड जपलेल्या बीज बँकेत विविध प्रकारच्या गावरान बियांचा समावेश आहे. याच बियांचा वापर करून त्यांनी श्रींची मृर्ती साकारली आहे.
बियाणे हेच आपले आयुष्य म्हणून शेतकरी वर्गासाठी दिवसरात्र कष्ट घेणार्या बीजमाता म्हणून नावलौकिक राहीबाई व त्यांच्या परिवारातील सदस्यांनी अतिशय कष्टाने आणि कल्पकतेने हे गणपती बाप्पा साकारले आहेत.
विविध रंगछटा आणि आकार असलेल्या बियांचा अतिशय सुबकतेने त्यांनी वापर केलेला आहे. तृणधान्य गळीतधान्य तेलबिया भाजीपाल्याची विविध बियाणे यांचा त्यांनी वापर केलेला आहे. या कामात त्यांचे नातवंड, मुले आणि सुना यांनी त्यांना मदत केली.
बाप्पांची जागासुद्धा बियाणे बँकेतच निवडण्यात आलेले आहे. देश आणि विदेशात मिळालेले पुरस्कार व सन्मान चिन्ह यांचा कल्पकतेने वापर करून सुंदर आरास बाप्पा भोवती तयार करण्यात आली आहे. राहीबाई यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून येत अनेक अडचणींवर मात करून पारंपारिक बियाणे जतन करून ठेवलेली आहेत.
हीच बियाण्यांची बॅेकंची महिमा आता सातासमुद्रापार गेलेली आहे. या राहिबाईंचा आदर्श आता जिल्ह्यासह राज्यभर घेतला जात असून अनेकांनी बियाण्यांची बॅंक सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु केलेले आहेत.


Post a Comment