अमर छत्तीसे
श्रीगोंदे ः कर्जमध्ये राजकीय भूकंप होणार... भाजपाचा एक नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर याबाबतचे वृत्त
तेजवार्ता डाॅट काॅम (Tejwart.com) वेबपोर्टलवर प्रसिध्द करण्यात आले. या वृत्तामुळे राजकीय वतुर्ळात खळबळ उडाली आहे. या राजकीय भूकंप एकदाचा होऊ जाऊन राजकीय उलथापलथ होेऊन जाऊन द्या, किती दिवस तारिख पे तारिख करणार आहेत. एकदाचा सोक्षमोक्ष लावा म्हणजे आम्हालाही काही तरी दिशा मिळेल, अशी प्रतिक्रिया सर्वसामान्यांमधून व्यक्त होत आहे.
कर्जत नगर पंचायतची निवडणूक तोंडावर येऊन ठेपलेली आहे. या निवडणुकीमुळे कर्जतमधील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. त्यातच अनेकजण आता भाजपामधून राष्ट्रवादीत दाखल होत आहे. काही दिवसांपूर्वीच भाजपाचे प्रसाद ढोकरीकर व दोन नगरसेवक ऱाष्ट्रवादीत दाखल झालेले आहेत. त्याअगोदर पासून भाजपाचा एक मोठा कर्जतमधील नेता राष्ट्रवादीत दाखल होणार आहे. अशी चर्चा होती. ती चर्चा आता खरी ठरत आहे.
कर्जतमधील तो मोठा नेता राष्ट्रवादीत दाखल होण्याच्या अगोदरच प्रसाद ढोकरीकर व इतर दाखल झालेले आहेत. या नेत्यानेही राष्ट्रवादीत यावे, यासाठी तीन-चार बैठका झालेल्या आहेत. मात्र या बैठकांमध्ये अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे त्या नेत्याचा प्रवेश नाकारलेला आहे. या संदर्भात लवकरच अंतिम बैठक होऊन प्रवेशाची तारिख ठरणार असल्याची चर्चा तेजवार्ता डाॅट काॅम (Tejwart.com) या वेबसाईटच्या वृत्तामुळे तालुक्यात सुरु झालेली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेली दबक्या आवाजातील चर्चा आता उघड होऊ लागलेली आहे. या चर्चेमुळे कार्यकर्ते संभ्रमावस्थेत आहेत. नेत्यांनी एकत्र बसवून थेट तोेडगा काढून पुढील राजकीय जाहीर करावे. हा तारिख पे तारिखचा कारभार त्वरीत थांबवून ठोस निर्णय घ्यावा, म्हणजे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना एक दिशा मिळू शकेल, अन्यथा कार्यकर्ते सैरभर होऊन इतर पक्षात जाण्याची भीती आता व्यक्त केली जात आहे.
मोठा नेता राष्ट्रवादीत जाणार म्हणल्यामुळे भाजपाच्या गोटात अस्वस्थता निर्माण झालेली आहे. त्या नेत्याने पक्ष सोडू नये, यासाठी त्यांची मनधरणी सुरु झालेली आहे. मात्र ठोस त्यावर निर्णय होत नसल्याची चर्चा सध्या आहे.

Post a Comment