पारनेर ः पतसंस्थांमुळे ग्रामीण भाग आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यास मदत झाली असल्याचे प्रतिपादन आमदार निलेश लंके यांनी केले.
छत्रपती संभाजी राजे ग्रामीण सहकारी पतसंस्थेच्या बेलवंडी फाटा शाखेच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शिक्षक नेते तथा प्रसिद्ध साहित्यिक डॉ. संजय कळमकर होते.
यावेळी शिक्षक समितीचे राज्य उपाध्यक्ष औटी, पारनेरचे सहाय्यक निबंधक गणेश औटी, दूध
संघाचे संचालक नानासाहेब लोखंडे, गुरुदत्त मल्टीस्टेटचे अध्यक्ष बा.
ठ. झावरे, गोरेश्वर पतसंस्थेचे अध्यक्ष बाजीराव पानमंद, शिक्षक समितीचे
जिल्हाध्यक्ष संजय धामणे, गुरुकुल मंडळाचे जिल्हाध्यक्ष सुदर्शन शिंदे,
कार्याध्यक्ष भास्कर नरसाळे, शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण ठुबे
,नगरपंचायत उपनगराध्यक्ष दत्तात्रय कुलट, नगरसेवक डॉ. मुदस्सर सय्यद
नंदकुमार औटी, आनंदा औटी, वाडेगव्हाणचे सरपंच बाळासाहेब सोनवणे, यादव
वाडीच्या सरपंच मीना यादव, माजी सरपंच संतोष यादव, पुणेवाडीचे सरपंच
बाळासाहेब रेपाळे ,भाजपाचे सरचिटणीस अशोक ईश्वरे, रावसाहेब दरेकर, सुभाष
यादव ,गणपत देठे, अंबादास झावरे, सुनील नरसाळे, सोपान राऊत ,रवींद्र रोकडे
अश्फाक शेख राजेंद्र दाते, हिम्मत चेमटे ,नारायण बाचकर, उद्योजक बाळासाहेब
राक्षे, नगर तालुका शिक्षक समितीचे अध्यक्ष मधुकर मैड, गुरुकुल मंडळाचे
अध्यक्ष दत्तात्रय जाधव आदी उपस्थित होते.
पुरस्कार जाहीर झालेल्या शिक्षकांचा सन्मानया कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्हा परिषदेचा गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर झालेल्या शिक्षकांचा सन्मान यावेळी आमदार श्री निलेश लंके यांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये रामदास नरसाळे पेंटर (पारनेर ), राजेंद्र पोटे (श्रीगोंदा), तुकाराम आडसुळ (पाथर्डी) या शिक्षकांना गौरवण्यात आले. विशेष म्हणजे हे तीनही पुरस्कार जाहीर झालेले शिक्षक हे पारनेर तालुक्याचे रहिवाशी आहेत .
Post a Comment