नेवासा : ज्ञानेश्वर माउलीच्या पसायदानाचे समाजहिताचे सूत्र अमलात आणताना शेवटच्या क्षणापर्यंत समाजाच्या हितासाठी आयुष्य वाचणारे लोकनेते मारुतराव घुले पाटलांनी समाजासाठी आपल्या आयुष्याचे दान दिले. समाजात अनेक वस्तूंचे दान दिले जाते. परंतु समाजासाठी आयुष्याचे दान देणे हे सर्वात मोठे दान आहे, असे प्रतिपादन नेवासा येथील श्रीसंत ज्ञानेश्वर मंदिराचे विश्वस्त शिवाजी महाराज देशमुख यांनी केले.
लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना व
उद्योग समूह भेंड्याचे संस्थापक लोकनेते मारुतरावजी घुले पाटील यांना
जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
सकाळी लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना
व उद्योग समूहाचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील,संचालक माजी
आमदार चंद्रशेखर घुले पाटील, उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग,जेष्ठ
संचालक अॅड. देसाई देशमुख, काकासाहेब नरवडे, शेवगाव पंचायत समितीचे सभापती व
कारखान्याचे तज्ञ संचालक डॉ. क्षीतिज घुले पाटील, श्रीसंत ज्ञानेश्वर
संस्थांनचे शिवाजी महाराज, उदयन गडाख, श्रीसंत नागेबाबा देवस्थानाचे अंकुश
महाराज कांदे, दिलीपराव लांडे, कार्यकारी संचालक अनिल शेवाळे, सचिव रवींद्र
मोटे आदींनी स्व.घुले पाटील यांचे स्मृतिस्थळावर पुष्प अर्पण करून अभिवादन
केले.
श्रीसंत
तुकाराम महाराज संस्थांनचे उद्धव महाराज मंडलिक म्हणाले,संत ज्ञानेश्वर
माऊली हे अध्यात्मिक क्षेत्रातील सर्वोच्च संत होऊन गेले. हे विश्वची माझे
घर अशी व्यापकता त्यांनी हृदयात बाळगली,तो विचार समाजाला दिला,सर्व जाती
धर्म-पंथ माऊलींनी आपलं म्हंटल म्हणून सर्व जगाने ने ही त्यांना आपले
मानले. राजकारणात काम करताना माऊलींचा तोच विचार लोकनेते घुले पाटलांनी
तंतोतंतअमलात आणला .घुले पाटलांच्या कार्यकुशलता व दूरदृष्टीमुळे
नेवासा-शेवगाव तालुक्यासह ज्ञानेश्वर कारखान्याचा परिसर समृद्ध झालेला आहे.
व त्यांच्या समृद्ध विचारांचा वारसा घुले बंधू समर्थपणे पुढे नेण्याचे काम
करीत आहेत.
यावेळी जिल्हा
परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे, राष्ट्रवादीचे नेवासा तालुकाध्यक्ष
काशिनाथ नवले, कार्याध्यक्ष दादासाहेब गंडाळ, अमोल अभंग, मुळा कारखान्याचे
संचालक भाऊसाहेब मोटे, नेवासा बाजार समितीचे सभापती डॉ. शिवाजी शिंदे, नेवासा
पंचायत समितीचे सभापती रावसाहेब कांगुणे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष
प्रभाकर कोलते, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अंबादास
कोरडे, भैयासाहेब देशमुख, रामदास गोल्हार, रामभाऊ जगताप, अॅड. बाळासाहेब
शिंदे, बाळासाहेब नवले, उत्तमराव वाबळे, बापूसाहेब नजन, ज्ञानेश्वरचे संचालक
काकासाहेब शिंदे, बबनराव भुसारी, अशोकराव मिसाळ, कामगार संचालक सुखदेव
फुलारी, जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे, तुकाराम मिसाळ, राष्ट्रवादीचे
प्रदेश सरचिटणीस गणेश गव्हाणे, शेवगाव बाजार समितीचे सभापती अनिल मडके आदिंनी स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले. व भजनास हजेरी लावली.
मारुतराव घुले पाटील स्मृती पुरस्कार रद्ददरवर्षी १५ सप्टेंबर रोजी लोकनेते मारुतराव घुले पाटील यांची जयंती कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो.जयंती निमित्ताने लोकनेते मारुतराव घुले पाटील स्मृती पुरस्कार दिला जातो. मात्र यावर्षी कोरोना महामारीच्या संकटामुळे यावेळी मोठा कार्यक्रम होऊ शकला नाही.कोविड-19 च्या सर्व नियमांचे पालन करत सोशल डिस्टन्सची मर्यादा पाळून स्वरूपाचा स्मृती स्थळावर अभिवादन व प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम झाला.
Post a Comment