पाथर्डी बाजार समितीचे गाळे व भूखंड माजी सैनिक, विधवा, अपंग व बेरोजगारांना द्या...


पाथर्डी ः
पाथर्डी कृषि उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य इमारतीच्या तसेच उपबाजार समितीच्या आवारातील गाळे व भूखंड तालुक्यातील स्वातंत्र्यसैनिक ,माजी सैनिक, अपंग, विधवा महिला तसेच सुशिक्षीत बेरोजगारांना व्यवसायासाठी भाडेतत्वावर देण्यात यावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तुळशीराम सानप यांनी केली आहे.
 

याबाबत तुळशीराम सानप यांनी पाथर्डी कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पाथर्डी कृषि उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य इमारतीच्या तसेच उपबाजार आवारातील गाळे व भूखंड तालुक्यातील स्वातंत्र्यसैनिक, माजी सैनिक, अपंग, विधवा महिला तसेच सुशिक्षीत बेरोजगारांना भाडेतत्वावर प्राधान्यानेे देण्यात यावेत. 

यासाठी ठराव मंजूर करण्यात यावा जर आपण तसा ठराव मंजूर केला नाही तर अमरण उपोषण केले जाईल, असा इशारा दिला आहे. या निवेदनाच्या प्रति सानप यांनी तहसीलदार पाथर्डी , जिल्हाधिकारी अहमदनगर व पोलिस अधीक्षक अहमदनगर यांना दिल्या आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post