नगर ः कर्जत तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून राजकीय भूकंपाचे धक्के बसत होते. आज नामदेव राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण भाजप सोडत असल्याचे जाहीर केल्यामुळे मोठा भूकंप झालेला आहे. त्यामुळे कर्जतमधील भाजपाची ताकद आता कमी झालेली आहे.
कर्जत नगर पंचायतीची निवडणूक तोंडावर येऊन ठेपलेली असून राजकीय उलाढाली सुरु झालेल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक फटका आता भाजपाला बसू लागलेला आहे. भाजपाचे अनेक शिलेदार आता राष्ट्रवादीच्या गोटात दाखल होत आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपात अस्वस्थ असलेले कर्जतचे प्रथम नगराध्यक्ष नामदेवराव राऊत यांनी आज भाजप सोडत असल्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे राजकीय भूकंप झालेला आहे.
या भूकंपातून आता भाजप कसे सावरणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. नामदेव राऊत यांनी पक्ष जाहीर केलेला नसला तरी ते राष्ट्रवादीत लवकरच दाखल होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
कर्जत नगर पंचायतची निवडणूक तोंडावर येऊन ठेपलेली आहे. या निवडणुकीमुळे कर्जतमधील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. त्यातच अनेकजण आता भाजपामधून राष्ट्रवादीत दाखल होत आहे. काही दिवसांपूर्वीच भाजपाचे प्रसाद ढोकरीकर व दोन नगरसेवक ऱाष्ट्रवादीत दाखल झालेले आहेत. त्याअगोदर पासून भाजपाचा एक मोठा कर्जतमधील नेता राष्ट्रवादीत दाखल होणार आहे. अशी चर्चा होती. ती चर्चा आता खरी ठरत आहे.

Post a Comment