महिला तलाठ्यासह कोतवाल रंगेहात पकडले


संगमनेर ः
तक्रारदार यांचे आजोबांचे मृत्यू पत्राप्रमाणे तक्रारदाराचे वडील व काकांचे नावे शेतजमिनीचा सातबारा उतार्‍यावर नाव लावण्यासाठी चार हजारांची लाच स्वीका
रल्यानंतर महिला तलाठी व कोतवाल अलगत नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहे. हा प्रकार दि.17 रोजी पथकाने संगमनेर तालुक्यातील निमगाव जाळी येथे ही कारवाई करण्यात आली.

याप्रकणात स्वाती बबनराव झुराळे, (वय-31, व्यवसाय  नोकरी, तलाठी, सजा निमगाव जाळी,  तहसील संगमनेर, जि.अहमदनगर, वर्ग-3) व संदीप लक्ष्मण तांबे (वर 31 वर्ष, व्यवसाय- नोकरी, कोतवाल, सजा निमगाव जाळी, ता. संगमनेर, जि.अहमदनगर) यांच्या वर कारवाई करण्यात आली आहे.                                                                            
ही कारवाई नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलिस अधीक्षक निलेश सोनवणे, पोलिस उपअधीक्षक सतीष भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा नाशिक विभागाचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक जयंत शिरसाठ,  पोलिस निरीक्षक सह सापळा अधिकारी श्रीमती मीरा अदमाने, सापळा पथक पोना नितीन कराड, पोना प्रभाकर गवळी, पोना प्रविण महाजन, चापोहवा संतोष गांगुर्डे यांनी केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post