बेरड यांनाच संधी द्यावी या दबक्या आवाजातील चर्चा आता उघड सुरु


नगर ः
भारतीय जनता पक्षाची बांधणी जिल्ह्यात मेहनत घेतलेल्या माजी जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांना एकनिष्ठेचे फळ मिळणे गरजेचे आहे. त्यांना विधान परिषदेची संधी द्यावी, अशी भाजपाच्या कार्यकर्त्यामध्ये दबक्या आवाजात सुरु असलेली चर्चा आता उघड सुरु झालेली आहे.


भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांनी पक्षासाठी एकनिष्ठतेने कामकाज केलेले आहे. त्यामुळे त्यांना लोकसभा व विधानसभेची उमेदवारी करण्याची संधी पक्षाकडून देण्यात येईल, अशी चर्चा होती. तसा विचारही पक्ष पातळीवर सुरु होता. मात्र राजकीय फासे पडले आणि ऐनवेळी बेरड यांचे नाव मागे पडून दुसऱ्यांना संधी देण्यात आली. त्यामुळे कार्यकर्ते नाराज झालेले होते. आता नाही तर पुढे संधी मिळेल, अशी आशा सर्वांना होती.
आता संधी चालून आलेली आहे. त्यामुळे विधान परिषदेसाठी आता भाजपाने भानुदास बेरड यांनाच संधी द्यावी, अशी मागणी आता सर्वसामान्य कार्यकर्त्यांमधून होत आहे. गेल्या काही दिवसांपासून दबक्या आवाजात सुरु असलेली चर्चा आता कार्यकर्ते उघडपणे करू लागलेले आहे. काहीजणांनी तर पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांकडे याबाबत चर्चा करण्याची तयारी सुरु केलेली आहे.
भाजपामध्ये अनेकजण विधान परिषदेसाठी अनेकजण इच्छूक आहेत. त्यांच्याकडून पक्ष पातळीवरून आपलेच नाव चर्चेत यावे, यासाठी प्रयत्न सुरु केलेले आहेत. अशांना पक्षाने संधी देण्याऐवजी आता सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी द्याव, अशी अपेक्षा आता व्यक्त केली जात आहे. तशी मागणी आता जोरधरू लागली आहे.

बेरड यांना आता संधी दिल्यास आता जिल्ह्यात भाजपाची कमी झालेली ताकद वाढविण्यास मदत होणार असून पक्ष संघटन मजबूत होऊन सर्वसामान्य मोठ्या प्रमाणात जोडले जाणार असल्याचे कार्यकर्त्यांमधून बोलले जात आहे. त्यामुले पक्षाने बेरड यांच्या नावाची चर्चा करावी, अशी अपेक्षा आता कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post