राज्यात तीन-चार दिवस पावसाचे...

मुंबई : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे वातावरणात बदल होत आहेत. बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला आहे. या चक्रीवादळामुळे राज्यात पुढील तीन ते चार दिवस मुसळधार पाऊस होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. आंध्रप्रदेशा, ओडिशा किनारपट्टीवर गुलाब नावाचं चक्रीवादळ धडकले आहे.


'गुलाब' चक्रीवादळाचा थेट परिणाम राज्यावरही होऊ शकतो. तर राज्यात पुन्हा पाऊस सुरू झाला आहे. यंदा राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या श्रेणीमध्ये किंवा अधिक पावसाची नोंद झाली आहे. दुसरीकडे राज्यातील नागरिकांनी ऑक्टोबरमध्येही पावसाला सामोरं जावं लागणार आहे. यावेळी ऑक्टोबरमध्येही पाऊस पडणार असून मान्सून इतक्यात माघार न घेण्याची चिन्ह दिसत असल्याचे माघारीची अद्याप चिन्हे नसल्याचे हवामानशास्त्र विभागाने म्हटले आहे. 

हवामानशास्त्र विभागाच्या म्हणण्याप्रमाणे, ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत राज्यात मान्सून सक्रीय राहणार आहे. पाच ऑक्टोबरनंतर मॉन्सूच्या माघारीची प्रक्रिया सुरू होणार आहे. आता ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यातही राज्यात पाऊस सक्रीय राहणार आहे. 

त्यानंतरच मान्सूनच्या माघारीच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. मुंबई आणि पुण्यातून मान्सूनच्या माघारीची तारीख 8 ते 9 ऑक्टोबरच्या आसपास असते. यंदाही याच काळात मॉन्सूनच्या माघारीची प्रक्रिया सुरू होणार आहे.

दक्षिण मध्य महाराष्ट्रात 30 सप्टेंबर ते सहा ऑक्टोबर या कालावधीत साधारण पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर बाकी राज्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बंगालच्या उपसागराच्या मध्य भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता असल्याने या काळात वायव्य आणि मध्य पावसाची शक्यता आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post