नगर ः जिल्ह्यातील कोरोनाचा आलेख सध्या वाढत आहे. जिल्ह्यातील संगमनेर, पारनेर, नगर आदी तालुक्यातील काही गावांमध्ये सध्या रुग्ण वाढल्याने तेथे कडक निर्बंध लादण्यात आलेले आहे. त्यामुळे या गावांमध्ये शाळा कशा भरल्या जाणार आहेत, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. त्यामुळे जिल्ह्यासह राज्यातील भविष्य सध्या अंधारमय वाटत असून ऑनलाइनच अनेक शाळा भरविल्या जाण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे.
राज्य सरकारने चार ऑक्टोबरपासून शाळा सुरु करण्यास परवानगी दिलेली आहे. त्यानुसार आता शिक्षण विभागाने तशी तयारी सुरु केलेली आहे. तसेच जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून आढावा घेण्यास सुरवात केलेली आहे. त्याबरोबरच शाळांनीही आता वर्गांमध्ये स्वच्छता मोहिम राबवून सॅनियाईज वर्ग खोल्या करण्यास सुरवात केलेली आहे.
मात्र जिल्ह्यातील कोरोनाचा आलेख सध्या कमी होण्याऐवजी वाढत चालला आहे. जिल्ह्यातील काही गावांमध्ये सध्या कडक निर्बंध लादण्यात आलेले आहे. त्यामुळे अशा ठिकाणी शाळा सुरु होणे अशक्य आहे. अशा गावांसह शेजारील गावातही शाळा सुरु करण्याच्या हालचाली होणार नसल्याची चर्चा सध्या नागरिकांमध्ये सुरु झालेली आहे.
त्याबरोबरच अनेक शाळेतील शिक्षक हे नियुक्तीच्या ठिकाणी न राहता तालुका व शहरी भागातून अपडाऊन करीत असतात. त्याचा दुष्परिणाम होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शिक्षकांना अपडाऊन बंद करून नियुक्तीच्या ठिकाणी राहण्याची अट घालावी किंवा स्वतःच्या वाहनाने अपडाऊन करावे, असा आदेश द्यावा, अशी मागणी होत आहे.
या सर्व बाबींचा विचार करणे आता काळात गरजेचे आहे. आदेश आला म्हणून त्याची अंमलबजावणी करण्याऐवज त्यावर स्थानिक पातळीवर परिस्थिती पाहून निर्णय घेणे महत्वाचे आहे. आता प्रशासन काय भूमिका घेते हे पाहणे औत्सुकतेचे ठरणार आहे.
Post a Comment