नीलेश लंके महाराष्ट्राचे नेतृत्व करणार ! अमोल मिटकरी


पारनेर :
  पाच वर्षे मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांना जे जमले नाही ते आमदार नीलेश लंके यांनी दोन वर्षात कोटयावधी रूपयांच्या कामांचा डोंगर उभा करून  दाखविले. फडणवीस यांनी सूडबुध्दीच्या राजकाणापलीकडे काहीच केले नाही. भविष्यात फाटक्या घरात जन्माला आलेला प्राथमिक शिक्षकाचा पुत्र महाराष्ट्राचे नेतृत्व करणार आहे, असे प्रतिपादन आमदार अमोल मिटकरी यांनी केले.

राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या शिरपूर येथे १ कोटी ३३ लाख रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ आमदार मिटकरी यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. आमदार नीलेश लंके कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

या वेळी मधुकर उचाळे, अशोक सावंत, जितेश सरडे, सुदाम पवार, ॲड. राहुल झावरे, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष बाबाजी तरटे, दादा शिंदे, सचिन पठारे, बाळासाहेब पुंडे, सोमनाथ वरखडे, संतोष काटे, जयसिंग मापारी, दत्ता आवारी, दीपक लंके, सत्यम निमसे, ठकाराम लंके,  भाऊसाहेब भोगाडे, श्रीकांत चौरे, डॉ. बाळासाहेब कावरे, बंडू साबळे, गणपत नरसाळे, भास्करराव उचाळे, शिवाशेठ लंके, कैलास कांदळकर, हनुमुंत भोसले, रामदास खोसे, किशोर थोरात, भाऊसाहेब खोमने, पंढरीनाथ सिनारे, संतोष नरसाळे, दिनेश लोनकर, मल्हारी सिनारे, मकाजी सिनारे, बंटी दाते, बन्सी दळवी, बाळासाहेब उचाळे, संभाजी नरसाळे, प्रकाश नरसाळे, भाऊसाहेब गाडगे, संदीप चौधरी, ईश्वर नगरे आदी उपस्थित होते .

मिटकरी म्हणाले, आपल्या पतीला ईडीच्या नोटीस यायला लागल्यानंतर पतीचे सर्वस्व वाचविण्यासाठी पक्ष बदलून आमच्यावर बोलणाऱ्या आमच्या भगीनींना आयुष्यात काहीच करता आले नाही. आमदार नीलेश लंके यांनी गेल्या दोन वर्षात सामाजिक कामासह विकास कामांमध्ये आपले वेगळेपण सिध्द केले. भविष्यात नीलेश लंके यांच्या कामावर विद्यापिठांमध्ये प्रबंध लिहिले जाणार आहेत. त्यांनी सुरू केलेल्या करोना सेंटरमध्ये एकाही रूग्णाचा मृत्यू होऊ शकत नाही हे  पाहिले तर हे अधुनिक युगात संत गाडगे महाराजांचे काम करीत आहेत असे अपणास वाटते असे मिटकरी म्हणाले. 

आ. मिटकरी म्हणाले, मंदीरे उघडण्यासाठी भाजपाचे लोक ढोल बजावत आहेत. संत गाडगेमहाराज, संत तुकाराम, संत तुकडोजी महाराज यांनी मंदीराबाहेर असलेल्या रंजलेल्या गांजलेल्यांमध्ये देव पाहिला. त्यांचाच हा विचार ज्याने पाहिला त्याचे नाव या अधुनिक युगात नीलेश लंंके हे आहे. संत गाडगे बाबांना मी पुस्तकांत वाचलं,  पण गाडगे महाराजांसारखा माणूस महाराष्ट्रात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आर आर आबांंची उणीव भरून काढणारा लोकनेता आ. लंके यांच्या रूपाने आमच्या पक्षाला मिळाल्याचे आ. मिटकरी म्हणाले.

भविष्यात मंत्रीमंडळाचा विस्तार होईल त्यावेळी होईल. आज आ. लंके यांच्याभोवतीचा गोतावळा पहिला तर माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची आठवण होते. त्यांच्या मते सर्वात श्रीमंत माणूस कोण असेल तर ज्याच्या दारामध्ये हजारो पादत्रानांचे जोडे आहेत तो । आज आ. लंके यांच्या घरात, कार्यालयात ही श्रीमंती मला पहावयास मिळाली ! 

फडणवीस यांना सत्तेची मस्ती आणि अहंकार !
राजकणारणात उतरल्यावर घाव तर होणारच. अहंकार नसलेला नेता म्हणजे आ. नीलेश लंके.  भाजपाच्या लोकांना तसेही सध्या काहीच काम उरलेले नाही. ते प्रत्येक वेळी कोणत्याही विषयांवर टिका करीत सुटतात.  ज्यांना अहंकार असतो ते राजकारणात परत दिसत नाहीत. फडणवीस म्हणाले होते मी पुन्हा येईन, पुन्हा येईन । त्यांना सत्तेची मस्ती व अहंकार होता अशी टीका मिटकरी यांनी केली.

आईचं मंगळसूत्र चोरणारा भाजपाचा आमदार !
चोर सुध्दा स्वतःच्या घरात चोरी करीत नाही. स्वतःच्या आईचे मंगळसुत्र चोरणारा एक पक्षाचा आमदार होतो. तो पक्ष कसा असेल असा सवाल मिटकरी यांनी केला.  माझ्यावर काही लोक आक्षेप घेत आहेत. मी कधीही माइया आईचं मंगळसुत्र चोरलं नाही. फाटयावर दारू विकली नाही. आई बहिणींचे संसार उध्वस्त केले नाहीत असे सांगत मिटकरी यांनी भाजपाचे विधानपरिषदेतील आमदार गोपीचंद पडळकर यांना अप्रत्यक्ष टोला लगावला.
पुढच्या वेळी मंत्री लंके यांच्यासोबत मी येईल !

भाळवणी येथे मी आ .लके यांच्या प्रचारसभेसाठी आलो होतो.  ते आमदार झाले. त्यांच्यासोबत मी पारनेरमध्ये आमदार म्हणून येईल असे स्वप्नातही वाटले नव्हते. आज मी आमदार म्हणून त्यांच्यासोबत आलो आहे. भविष्यात ज्यावेळी मी आमदार म्हणून त्यांच्यासोबत येईल त्यावेळी ते मंत्री असतील.मी मोजून शब्द बोलणारा माणूस आहे अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

माझे वडील धन्य झाले असतील ! 
आ. लंके यांच्या घरी मुक्काम केला. त्यांच्या आई वडीलांची भेट झाली. ते पाहून माल माइया वडीलांची आठवण झाली. माझे वडील आज असते तर पवार साहेब अजितदादा यांच्या समवेत मी आमदार म्हणून व्यासपिठावर बसताना त्यांना मोठा आनंद झाला असता. आज माझ्यासारख्या  सामान्य कुटूंबातील आमदाराकडून जागतीक पातळीवरील आ. नीलेश लंके यांनी विविध कामांची भुमिपुजने करून घेतली ते पाहून माझे वडील धन्य झाले असतील असे सांगत मिटकरी यांनी आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post