मुंबई ः शेअर बाजाराच्या निर्देशंकांनी विक्रमी टप्प्याला गवसणी घातली असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे दीर्घकालीन कालावधीसाठी पैसे गुंतवकदार मालामाल झाले आहेत. एस्ट्रल शेअर्समुळे गुंतवणूकदार मालामाल झालेले आहे.
मागील दहा वर्षांचा विचार केल्यास एस्ट्रल शेअर्स कंपनीच्या समभागाने गुंतवणूकदारांना तब्बल 8,560 टक्के रिटर्न्स मिळवून दिले आहेत. दहा वर्षांपूर्वी एस्ट्रल शेअर्सच्या एका समभागाची किंमत अवघी 24 रुपये होती. हीच किंमत आता 2063 रुपये इतकी झाली आहे. गेल्या महिनाभरातच या समभागाने गुंतवणूकदारांच्या गंगाजळीत चार टक्क्यांची भर टाकली आहे. एका महिन्यात समभागाची किंमत 1982.05 वरुन 2063 रुपये इतकी झाली आहे.
गेल्या सहा महिन्यात एस्ट्रल शेअर्सच्या समभागांची किंमत 30 टक्क्यांनी वाढली आहे. सहा महिन्यांपूर्वी कंपनीच्या एका समभागाची किंमत 1591.65 रुपयांवरून 2085.30 रुपयांपर्यंत पोहोचली होती. गेल्या वर्षभरात एस्ट्रलचे शेअर्स 850.95 च्या किंमतीवरून 140% वाढून 2063 रुपये झाले आहेत.
पाच वर्षांपूर्वी एस्ट्रल शेअर्सची किंमत 263.73 रुपये होती. त्याचप्रमाणे, गेल्या 10 वर्षांत हा स्टॉक 23.82 रुपयांच्या किंमतीपेक्षा 86.4 पट वाढून 2063 रुपये झाला आहे.
Post a Comment