मुंबई : डिझेल सलग चौथ्या दिवशी तर पेट्रोलच्या दरांमध्ये तब्बल 22 दिवसांनंतर वाढ झाली आहे. मागील चार दिवसांपासून डिझेलचे दर वाढत आहेत.
सरकारी तेल कंपन्यांनी डिझेलचे दर 25 पैशांनी वाढवले आहेत. तसेच पेट्रोलचे प्रतिलिटर मागे 20 पैशांनी वाढवण्यात आले आहेत. मुंबईमध्ये पेट्रोलचे दर प्रतिलिटरमागे 21 पैशांनी वाढले आहेत.
मागील पाच दिवसांमध्ये डिझेलचे दर 95 पैशांनी वाढ झालेली आहे. या वाढीमुळे वाहतूकदारांनीही आता भाडे आकारणीत वाढ करण्यास सुरवात केली आहे.
पेट्रोल-डिझेलच्या दराने पुन्हा एकदा लोकांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. पेट्रोल व डिझेल दरात वाढ करण्याऐवजी घट करण्याची मागणी होत आहे.
यापूर्वी ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी 24, 26 आणि 27 सप्टेंबरलाही डिझेलचे दर वाढवले होते. त्यात आज पुन्हा वाढ झालेली आहे. या दरवाढी थेट परिणाम सर्वसामान्यांवर होत आहे.
Post a Comment