राहात्यात डाळिंबाच्या भावात वाढ


राहाता ः
राहाता बाजार समितीत डाळिंबाला आज चांगला भाव मिळाला. एक नंबर डाळिंबाला 175 रुपये किलोचा भाव मिळाला.

राहाता बाजार समितीत डाळिंबाच्या दहा हजार 622 क्रेटसची आवक झाली. यामध्ये एक नंबर डाळिंबाला 121 ते 175, दोन नंबर डाळिंबाला ः 81 ते 120, तीन नंबर डाळिंबाला ः 41 ते 80, चार नंबर डाळिंबाला अडीच रुपये ते 40 रुपये प्रतिकिलोचा भाव मिळाला. 

रविवारी डाळिंबाला 155 रुपये किलोपर्यंत भाव मिळाला होता. मात्र आज डाळिंबाच्या भावात तब्बल 25 रुपयांनी वाढ झालेली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post