एसटीची भाडेवाढ कशी झाली ते पहा... अहमदनगरहून तालुक्याच्या ठिकाणचे एसटीचे असे राहणार दर...

मुंबई : राज्य परिवहन महामंडळाने आज (सोमवारी)मध्यरात्रीपासून एसटीच्या प्रवाशी भाड्यात दरवाढ केलेली आहे. ही दरवाढ प्रवाशांच्या खिशाला कात्री लावणारी ठरणार आहे. 


डिझेल व पेट्रोलच्या भावात दररोज वाढ होत आहे. या वाढीमुळे सर्वच वस्तुंच्या भावात वाढ होऊ लागलेली आहे. आता ही दरवाढ एसटीच्या दरवाढीपर्यंत येऊन ठेपलेली आहे. गेल्या तीन वर्षात न झालेली प्रवाशी दरवाढ मात्र आता झालेली आहे.

अहमदनगरहून आपल्या तालुक्याच्या ठिकाणी किती दरवाढ झालेली आहे. हे आता जाणून घ्या. अहमदनगर -संगमनेर ः 150, अहमदनगर-शेवगाव ः 95, अहमदनगर-श्रीरामपूर ः 105, अहमदनगर-कोपरगाव ः 150, अहमदनगर-जामखेड ः 115, अहमदनगर-पारनेर ः 60, अहमदनगर- नेवासा ः 90, अहमदनगर-श्रीगोंदा ः 95, अहमदनगर-पाथर्डी ः 80, अहमदनगर-राहुरी ः 60, अहमदनगर- नेवासा ः 90, अहमदनगर- श्रीगोंदा ः 95, अहमदनगर-पाथर्डी ः 80, अहमदनगर-राहुरी ः 60, अहमदनगर-कर्जत ः 115, अहमदनगर-अकोले ः 185, अहमदनगर-शिर्डी ः 130. हे सर्व दर साध्या बसचे आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post