मुंबई : उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे शेतकर्यांना चिरडल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. महाविकास आघाडी सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. त्याला महाविकास आघाडीतील शिवसेना व काँग्रेसनेही सहमती दर्शवली आहे.
लखीमपूर येथील घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. 11 ऑक्टोबरला हा बंद पुकारण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने 11 ऑक्टोबरला बंद करण्यात येणार असल्याचा निर्णय जयंत पाटील यांनी जाहीर केला.
हा बंद पक्षातर्फे आहे. सरकारतर्फे नाही. मात्र महाविकास आघाडीमधील इतर मित्रपक्षासोबतदेखील आम्ही बोलणार असल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.
यावेळी जयंत पाटील यांच्या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात उपस्थित होते. लखीमपूर घटनेचा निषेध म्हणून पक्ष म्हणून महाविकास आघाडी अकरा ऑक्टोबरला बंद करणार आहोत.
आज मंत्रिमंडळाने देखील याबाबात खेद व्यक्त केला आणि हुतात्मांना श्रद्धांजली वाहण्यात आली. भाजप क्रूरपणे वागून शेतकरी आंदोलन चिरडात आहे.
संबंधित आरोपींना अटक देखील झाली नाही. त्यामुळे याचा देखील निषेध आम्ही करणार आहोत, असे जयंत पाटील यांनी सांगितले.
Post a Comment