नवी दिल्ली : नोव्हेंबरध्ये जर बँकांची कामे करायची असेल तर प्रत्येकाने नियोजन करणे गरजेचे आहे. प्रत्येकाने घरात.आता पैसे काढून ठेवणे गरजेचे आहे. नाही तर ऐनवेळी पैसे असूनही अडचणीचा सामना करण्याची वेळ येईल. कारण नोव्हेंबरमध्ये एक ते दोन नव्हे तब्बल 17 दिवस बँक बंद राहणार आहेत.
देशात सणांसह नोव्हेंबरची सुरुवात होत आहे. अशा स्थितीत बहुतांश विभागांना सुट्टी असणार आहे. यात भारतीय रिझर्व्ह बँकेने बँकांच्या सुट्ट्यांची यादी देखील जाहीर केली आहे. ही यादी तब्बल 17 दिवसांची आहे.
नोव्हेंबर 2021 मध्ये धनत्रयोदशी, दिवाळी, भाई दूज, छठ पूजा व गुरु नानक जयंती यासारख्या मोठ्या सणांसह एकूण 17 दिवस बँकांमध्ये सामान्य कामकाज होणार नाही.
मात्र, या 17 दिवसांच्या सुट्ट्या देशभरातील बँकांमध्ये एकत्र दिल्या जाणार नाहीत. काही राज्यांमध्ये तेथे साजरे होणारे सण व उत्सव यावर अवलंबून अतिरिक्त सुट्ट्या असणार आहे.
आरबीआय दर महिन्याला सुट्ट्यांची संपूर्ण यादी प्रसिद्ध करते. कोणत्या राज्यात बँका केव्हा बंद होतील ते जाणून घेणे महत्वाचे ठरणार आहे. बँकेच्या ग्राहकांना शाखेशी संबंधित महत्त्वाच्या कामांना सामोरे जावे लागत असेल, तर ते या महिन्यात करण्याची आवश्यकता आहे.
आरबीआयने 1, 3, 4, 5, 6, 10, 11, 12, 19, 22 आणि 23 नोव्हेंबर रोजी सुट्टी जाहीर केलीय. याशिवाय नोव्हेंबरमध्ये 4 रविवार आणि दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी देशभरात बँकांना सुट्टी असणार आहे..
Post a Comment