हंडाळवाडीच्या विविध मागण्यासाठी उपोषण...

पाथर्डी : नगरपालिका हद्दीत सामावेश असलेल्या हंडाळवाडी गावाच्या विविध मागण्यासाठी शिवसेनेचे माजी शहराध्यक्ष भाऊसाहेब धस यांच्या नेतृत्वाखाली हंडाळवाडी येथील मंदिरात उपोषण करण्यात आले.


दूध शीतकरण केंद्र ते हंडाळवाडी स्ट्रीट लाईट बसवून रस्ता दुरुस्ती करावी, हंडाळवाडी ते भापकर वस्ती रस्ता काँक्रटीकरण करावा, धसवस्ती ते मोहरीरोड रस्ता काँक्रटीकरण करण्यात यावे, आदी मागण्यासाठी उपोषण सुरू आहे.

भाऊसाहेब धस यांनी यापूर्वी मागील महिन्यात या मागण्यांच्या संदर्भात २७ सप्टेंबर २०२१ राजी उपोषण केले होते. त्यावेळी दिवाळीपूर्वी सर्व कामे मार्गी लावू, असे लेखी आश्वासन पालिकेच्या वतीने त्यांना देण्यात आले हो ते त्यानंतर धस यांनी उपोषण मागे घेतले.

आश्वासन देऊन वीस ते बावीस दिवस होऊन सुद्धा कोणतीच कामे हंडाळवाडी गावात सुरू न झाल्याने पुन्हा धस यांनी ग्रामस्थांच्या मदतीने गावात उपोषण सुरू केले आहे.

रावसाहेब कराळे, लक्ष्मण हंडाळ, राजेंद्र उराडे, अनिल भापकर,अशोक हंडाळ,शशी हंडाळ, सुनिल परदेशी, दत्तू उराडे, भिमाजी वाघमोडे, आबा हंडाळ, बाळासाहेब हंडाळ, अक्षय उराडे, काशिनाथ भिसे आदींनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

गावातील मूलभूत सुविधा सोडवण्यासाठी पालिकेकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. मात्र नगरपालिका कोणतीच दखल घेत नसल्यामुळे पुन्हा लोकशाही मार्गाने उपोषण करण्याची वेळ आली अशी भावना भाऊसाहेब धस यांनी यावेळी बोलून दाखवली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post